दुबईमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान सामन्यात हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. सामान्यामध्ये पाकिस्तान तुफान वादही झाले. भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांचा पाकिस्तानी खेळाडूंशी वाद झाला. या कारणामुळे काही काळासाठी सामना थांबवण्यात आला होता.
या सामन्यात पाकिस्तानने आधी फलंदाजी करत 50 षटकांत 8 विकेट्स गमावून तब्बल 347 धावांचा डोंगर उभारला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही. अवघ्या तिसऱ्या षटकातच भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे अवघ्या 7 चेंडूंमध्ये 2 धावा करून बाद झाला.
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज अली रजाच्या चेंडूवर आयुषने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू हवेत उडून मिड-ऑफवर उभ्या असलेल्या फरहान युसूफच्या हातात गेला. विकेट घेतल्यानंतर अली रजाने आक्रमक होऊन जल्लोष करत आयुष म्हात्रेकडे बघत काही शब्द उच्चारले. हा सेंड-ऑफ आयुषला अजिबात आवडला नाही आणि तो संतापला.
आयुष थेट अली रजाकडे गेला आणि दोघांमध्ये तीव्र वादावादी सुरू झाली. मैदानावरील वातावरण चांगलेच तापले, अखेर अंपायर्सनी दोघांना वेगळं केलं. या वादादरम्यान आयुषचा ओपनिंग पार्टनर वैभव सूर्यवंशीही पुढे आला. तो परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसला.
आयुष लवकर बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने भारताला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही जास्त वेळ टिकू शकला नाही. वैभव सूर्यवंशी 10 चेंडूंमध्ये 26 धावा करून बाद झाला आणि हा विकेटसुद्धा अली रजानेच घेतला. यावेळीही पाकिस्तानी खेळाडूंनी आक्रमक पद्धतीने जल्लोष केला. हे पाहून वैभव सूर्यवंशीही संतापला आणि पाकिस्तानी खेळाडूंशी त्याची जोरदार शाब्दिक झटापट झाली. सुदैवाने हा वाद फार पुढे गेला नाही आणि वैभव पवेलियनकडे परतला. मात्र या घटनेने फायनल सामन्यातील तणाव जास्तच वाढवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.