Heinrich Klaasen X
Sports

Heinrich Klaasen : ६,४..४..४..४..४.. पुथुर-पंड्याची धुलाई, हेनरिक क्लासेनचे अर्धशतक अन् हैदराबादची नामुष्की टळली

SRH VS MI IPL 2025 : एकाना स्टेडियमवर आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचे महत्त्वाचे खेळाडू फ्लॉप झाले. त्यानंतर हेनरिक क्लासेनच्या खेळीमुळे हैदराबादने कमबॅक केले.

Yash Shirke

SRH VS MI : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना आज एकाना स्टेडिमयवर रंगला आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हैदराबादचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. पण हैदराबादची फलंदाजी सुरुवातीलाच ढेपाळली. नवव्या ओव्हरपर्यंत हैदराबादची धावसंख्या ३५/५ इतकी होती.

५ विकेट्स पडल्यानंतर हेनरिक क्लासेनने एम्पॅक्ट प्लेयर अभिनव मनोहरच्या साथीने मोर्चा सांभाळला. दहाव्या ओव्हरमध्ये विग्नेश पुथूर गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या ओव्हरमध्ये क्लासेनने ६,४,०,४,०, १ अशा प्रकारे १५ धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्याच्या ओव्हरमध्ये ४, ०, ४, २, ४, १ अशा प्रकारे हेनरिक क्लासेनने ३ चौकार मारले. हातून सुटलेला सामन्यात क्लासेनमुळे हैदराबादने कमबॅक केले.

हैदराबादचे प्रमुख ४ फलंदाज आज पुन्हा फ्लॉप झाले. ट्रेव्हिस हेड शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्माने ८ धावा केल्या. गोंधळात डीआरएस न घेतल्याने इशान किशनला १ धाव करुन माघारी परतावे लागले. नितीश कुमार रेड्डी २ धावांवर बाद झाला. संघर्ष करताना १२ धावा करताना अनिकेत वर्मा कॅचआउट झाला. दीपक चहरने इशान आणि नितीशला, ट्रेंट बोल्टने हेड आणि अभिषेकला; तर हार्दिक पंड्याने अनिकेत वर्माला बाद केले.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनदकट, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT