harshada garud, junior asian weightlifting championship 2022, maval saam tv
Sports

Harshada Garud : एशियन वेटलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या हर्षदा गरूडनं पटकाविलं 'सुवर्ण'

यापुर्वी देखील हर्षदा गरुडने उज्जवल कामगिरी केली आहे.

साम न्यूज नेटवर्क

मावळ : ताशकंद येथे सुरु असलेल्या ज्युनिअर एशियन वेटलिफटिंग (weightlifting) अजिंक्यपद (junior asian weightlifting championship 2022) स्पर्धेत आज (साेमवार) 45 किलो वजनी गटात भारताच्या (india) हर्षदा गरुड (Harshada Garud) हिने स्नॅच प्रकारात 69 किलो व क्लीन आणि जर्क प्रकारात 88 किलो असे एकूण 157 किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक (gold medal) मिळविले. (Harshada Garud News)

हर्षदा ही वडगाव मावळ (maval) येथील दुबेज गुरुकुलची खेळाडू आहे. मे महिन्यात ग्रिस येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकाविले हाेते. हे पदक मिळविणारी भारतातील पहिली महिला होण्याचा मान तिने मिळविला होता.

आज ताशकंद येथे सुरू झालेल्या एशियन स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवून आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यात यश मिळविले. सध्या ती पतियाळा येथील इंडिया कॅम्पमधे सराव करत आहे. आगामी काळात हर्षदा भारतीय वेटलिफ्टींगमधे इतिहास घडवेल असा विश्वास तिचे मार्गदर्शनक बिहरीलाल दुबे यांनी व्यक्त केला आहे.

हर्षदाचे इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकात शेटे, पुणे जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचे अध्यक्ष गणेश काकडे, नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी अभिनंदन केले. मावळ तालुक्यातील नागरिक तिचे समाज माध्यमातून कौतुक करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT