सातारा : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमीच समाज माध्यमातून (Social Media) सातत्याने समाजात चाललेल्या गाेष्टींवर त्यांच्या शैलीने भाष्य करीत असतात. काही वेळेला ते मनोरंजक व्हिडिओ क्लिप, कधी वैचारिक तर नव नव कल्पनांच्या क्लिप ट्विट (tweet) करीत असतात. महिंद्रा यांच्या ट्विटमध्ये सामाजिक (social) संदेश देखील असतात. आजही त्यांनी केलेल्या एक ट्विटच्या माध्यमातून सांघिक कामगिरी यावर प्रकाशझाेत टाकला आहे. (anand mahindra tweet news)
महिंद्रा यांनी इंग्लिश प्रीमियर लीगमधील फुटबॉल स्पर्धेतील एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. “नक्कीच टीमवर्क,” असं आनंद महिंद्रा यांनी संबंधित क्लिप शेअर करताना लिहिलं आहे. महिंद्रा यांनी मँचेस्टर युनायटेड (Manchester United) आणि मँचेस्टर सिटी (Manchester City) या दाेन पारंपारिक प्रतिस्पर्धी यांच्या सामन्यातील त्यांना भावलेला क्षण शेअर केला आहे.
या क्लिपमध्ये मँचेस्टर सिटी (निळ्या रंगातील संघ) संघातील खेळाडू गाेल नाेंदविण्यासाठी एकमेकांना कशा पद्धतीने पास देताहेत हे दिसून येत आहे. त्यावपर महिंद्रा यांनी स्टार्टअप्सनं हा धडा घ्यावा असं नमूद केले आहे. या क्लिपमध्ये मँचेस्टर सिटी संघातील खेळाडूंनी गाेल नाेंदविण्यासाठी तब्बल 44 वेळा चेंडू पास केला आहे. अखेरच्या पासमध्ये गोल नाेंदविल्यानंतर खेळाडू जल्लाेष करताना दिसत आहे.
या कृतीवर महिंद्रा यांनी यश हे केवळ पुढ जाण्यावर नसून त्यामध्ये धाेरणात्मक निर्णय आणि सांघिक कामगिरी करताना नवीन दृष्टीकाेन देखील असणं आवश्यक आहे असेही म्हटलं आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.