Neet Exam : नीट परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज; देशभरातील 497 केंद्रावर आज परीक्षा

गेल्या काही दिवसांपासून NEET Exam 2022 वेळापत्रकानुसार हाेणार की नाही याची चर्चा हाेती. परंतु आज निश्चित वेळापत्रकानुसार परीक्षा हाेणार आहे.
neet exam
neet examsaam tv
Published On

औरंगाबाद / बुलढाणा : राज्यातील विविध जिल्ह्यात आज (रविवार) वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET Exam 2022) दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. ही परीक्षा (neet exam) विद्यार्थ्यांना (students) इंग्रजीसह मराठी, तेलगू, तमिळ, हिंदी, उर्दू, पंजाबीसह एकूण 13 प्रादेशिक भाषेत देण्याची मुभा आहे. यंदा प्रथमच वीस मिनिटांचा वेळ परीक्षेसाठी वाढवून देण्यात आला आहे. यानुसार दुपारी दाेन ते सायंकाळी पाच वाजून वीस मिनीटांपर्यंत ही परीक्षा (exam) होईल. (neet exam news)

18 लाख विद्यार्थ्यांची नाेंदणी

दरम्यान देशभरातील सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नाेंदणी केली आहे. ही परीक्षा देशभरातील 497 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. याबराेबरच देशाबाहेरील 14 शहरांमध्येही देखील ही परीक्षा घेतली जाणार आहे. (neet exam today)

औरंगाबाद शहरातील 37 केंद्रांवर आज नीटची परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी 17 हजार 828 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय. दुपारी दोन वाजेपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. परिक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना सकाळी 11 ते दुपारी दीड वाजेपर्यंत स्लॉटवाईझ बोलवण्यात आले आहे.

neet exam
Singapore Open : सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू विजयी

बुलडाण्यात तयारी पुर्ण

बुलडाणा जिल्ह्यातील १५ परीक्षा केंद्रावर ५१९५ विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज नीट (NEET Exam 2022) परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सरकारी मेडिकल कॉलेजला प्रवेश दिल्या जात असल्याने या परीक्षेचे वेगळे महत्व आहे. बुलडाणा शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सहकार विद्या मंदिर, शारदा ज्ञानपीठ बुलडाणा, एडेड हायस्कूल बुलडाणा, सेंट जोसेफ हायस्कूल बुलडाणा, खामगाव येथील सरोजबेन दामजीभाई विकमशी ज्ञानपीठ, सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकर, स्कूल ऑफ स्कॉलर मलकापूर, पंकज लद्धड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येळगाव, भारत विद्यालय बुलडाणा, प्रबोधन विद्यालय बुलडाणा, शिवसाई युनिव्हर्सल जूनियर कॉलेज बुलडाणा, सेंट्रल पब्लिक स्कूल लोणार या परीक्षाकेंद्रावर कडेकोट बंदोबस्तात ही परीक्षा पार पडणार आहे.

neet exam
Sindhudurg Rain : निर्मला नदीचा पुर ओसरला; दळणवळण सुरु
neet exam
Tasgoan News : मणेराजूरीतील युवकाच्या खूनप्रकरणी तिघे अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com