Harshada Garud: सुवर्णपदक विजेत्या हर्षदा गरुडचे पालक भावूक; तिने नवी ओळख दिली!

हर्षदा गरुड हिच्यावर देशभरातून काैतुकाचा वर्षाव हाेऊ लागला आहे.
Harshada Garud Parents
Harshada Garud Parentssaam tv
Published On

मावळ : आम्ही मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही. तिची आवड जाेपासत ज्या ज्या गाेष्टी तिच्या खेळासाठी (sports) तसेच शिक्षणासाठी (education) आवश्यक हाेत्या त्या तिला दिल्या. आज आमच्या मुलीने देशासाठी सुवर्णपदक (harshada garud bagged gold in weightlifting) पटकाविले याचा आम्हांला खूप अभिमान वाटत आहे परंतु तिने आम्हांला ते पहा हर्षदाचे आई वडील अशी जी नवी ओळख दिली त्याचे अप्रुप वाटत असल्याची भावना वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियन (weightlifter) हर्षदा गरुडच्या (harshada garud) आई रेखा आणि वडील शरद गरुड यांनी व्यक्त केली. (harshada garud latest marathi news)

मावळची (maval) कन्या हर्षदा गरुड हिने महिलांच्या पंचेचाळीस किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिच्यावर काैतुकाचा वर्षाव हाेऊ लागला आहे. मावळ मधील वडगावात हर्षदा वास्तव्यास आहे. दुबे यांच्या जिममध्ये तिने वेटलिफ्टिंगचे (weightlifting) धडे घेतले. हर्षदा लहान पासून जिद्दी आहे. कोणतेही काम हातात घेतले की ती पूर्ण करते. तिची आकलन शक्ती इतर मुलींपेक्षा जास्त आहे म्हणून दुबे यांनी तिच्यावर अधिक कष्ट घेत तिला विविध स्पर्धेसाठी तयार केले. आतापर्यंत तिने विविध स्पर्धेत मावळचे नाव उज्जवल केले. एशियन स्पर्धेत तिला दोन कास्य पदक मिळाले होते. देशासाठी तिने सुवर्णपदक मिळवून दिल्याने तिचा मला अभिमान आहे असे प्रशिक्षक बिहरीलाल दुबे यांनी नमूद केले.

Harshada Garud Parents
हर्षदाने इतिहास रचला, मीराबाईला टाकले मागे, IWF मध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय

हर्षदाचे वडील शरद हे वडगाव नगरपंचायतीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. तर आई रेखा या गृहिणी आहेत. त्या शिवणकाम करतात. हर्षदाचे वडिल शरद म्हणाले माझी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मला वेटलिफ्टिंगमध्ये नाव कमावता आले नाही पण माझ्या मुलीने ती इच्छा पुर्ण केली. तिने देशासाठी सुवर्णपदक जिंकले याचा आम्हांला खूप अभिमान वाटत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Harshada Garud Parents
Satara: सेकंड इनिंग, बेत, मला हिरो व्हायचंयने जिंकली रसिकांची मने
Harshada Garud Parents
खून्नशीतून मांजरी बुद्रुकच्या माजी सरपंचावर गाेळीबार; उपचारार्थ रुग्णालयात दाखल
Harshada Garud Parents
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंनी धर्म, संस्कृती, हिंदुत्व गहाण ठेवलं: सोमय्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com