Harmony Tan, Serena Williams, Wimbledon
Harmony Tan, Serena Williams, Wimbledon Saam Tv
क्रीडा | IPL

Wimbledon 2022 : सेरेना विल्यम्स पहिल्याच फेरीत गारद; नदालची आगेकूच

Siddharth Latkar

नवी दिल्ली : विम्बल्डन (Wimbledon) स्पर्धेत (tennis) २३ वेळा विेजेती ठरलेली अमेरिकाची खेळाडू सेरेना विल्यम्स (Serena Williams) हिला मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. तीन तास चाललेल्या या सामन्यात (sports) फ्रेंच खेळाडू हार्मनी टेन (Harmony Tan) हिने सेरेनावर विजय नाेंदविला. (Wimbledon 2022 Latest Marathi News)

सेरेनाचे वर्षभरानंतर पुनरागमन

अमेरिकेची स्टार खेळाडू सेरेना विल्यम्सला पहिल्या फेरीचा सामना गमवावा लागला. तिला फ्रेंच खेळाडू हार्मनी टेनने ७-५, १-६, ७-६ असे पराभूत केले. सेरेनाने वर्षभरानंतर पुनरागमन केल्याने तिच्या विजयाची चाहत्यांना खात्री हाेती. मात्र हार्मनीने तिला विजयापासून राेखले. दुखापतीमुळे सेेरेना हिने गत मोसमात माघार घेतली होती.

त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू इगा स्वताकेने विम्बल्डनची दुसरी फेरी गाठली. पोलंडच्या इगाने अवघ्या 74 मिनिटांत क्रोएशियाच्या जना फेटचा 6-0, 6-3 असा पराभव केला.

पाचवी मानांकित मारिया सक्कारी, 12वी मानांकित जेलेना ओस्टापेन्को, 13वी मानांकित बार्बरा क्राजिकोवा, 4वी मानांकित पॉला बडोसा, माजी नंबर 1 सिमोना हालेप, माजी चॅम्पियन पेट्रा क्विटोवा आणि 18 वर्षीय कोको गॉफ यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरीत (alex) डी मायनर, स्टीव्ह जॉन्सन, डेव्हिड गॉफिन, जॅक सॉक, मॅकेन्झी मॅकडोनाल्ड, ख्रिश्चन जेरिन, रिचर्ड गॅस्केट यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

चॅम्पियनशिपमधील नवव्या मानांकित गार्बिन मुगुरुझाला पराभवाचा धक्का बसला आहे. तिला जर्मनीची बिगरमानांकित खेळाडू जी मिनेन हिने 6-4 असे पराभूत केले. मुगुरुझाने पहिल्या सेटनंतर खेळ सोडला.

नदालचा संघर्षमय विजय

दुसऱ्या मानांकित राफेल नदालने (Rafael Nadal) पहिल्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या राफेल नदालने अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को सेरेंडिनाचा (Francisco Serendina) ६-४, ६-३, ३-६, ६-४ असा पराभव केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

Ravindra Dhangekar | Viral Video वर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया!

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

Today's Marathi News Live : साखर कारखान्याचा १०००० कोटींचा आयकर माफ केला, देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT