IND VS AUS Saam Tv
Sports

IND vs AUS:टीम इंडिया अन् नॉकआऊट फेरीत रनआउट; ८ वर्षांपासून सुरु आहे दर्दभरी कहाणी

नॉकआऊट सामन्यांमध्ये रनआउट होणं आणि भारतीय संघाने सामना गमावणं हे भारतीय संघासाठी काही नवीन नाहीये

Ankush Dhavre

IND vs AUS:भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पुरुष संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये जोरदार कामगिरी करतात. मात्र वेळ जेव्हा आयसीसीच्या स्पर्धेची येते, त्यावेळी भारतीय संघाचा प्रवास हा सेमीफायनल किंवा फायनलपर्यंत मर्यादित राहतो.

आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जेव्हाही भारतीय संघ सहभागी होतो, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना वाटतं की भारतीय संघ ट्रॉफी जिंकणार. मात्र नॉकआऊट सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता येत नाहीये.

नॉकआऊट सामन्यांमध्ये रनआउट होणं आणि भारतीय संघाने सामना गमावणं हे भारतीय संघासाठी काही नवीन नाहीये. यापूर्वी देखील आपण हे पाहिलं आहे. (Latest Sports Updates)

गुरुवारी भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना पार पडला. १७३ धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघ मजबूत स्थितित होता.

असं वाटत होतं की भारतीय संघ हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार. मात्र त्याचवेळी हरमनप्रीत कौर रनआउट झाली आणि भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला.

नॉकआऊट सामन्यात रनआउट..

तर झाले असे की , १५ व्या षटकात हरमनप्रीत कौरने २ धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरी धाव घेत असताना तिची बॅट फसली आणि दुर्दैवाने ती रनआउट होऊन माघारी परतली. ती बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने कमबॅक केले आणि हा सामना देखील जिंकला.

२०१५- सिडनी

नॉकआऊट सामन्यांमध्ये रनआउट झाल्यानंतर भारतीय संघाने समान गमावण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी देखील २०१५ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात एमएस धोनी ६५ धावांवर फलंदाजी करत असताना रनआउट होऊन माघारी परतला होता. त्यानंतर भारतीय संघाने हा सामना गमावला होता.

२०१७- लॉर्ड्स

तसेच २०१९ मध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले होते. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडचा सामना करताना भारतीय संघाला केवळ २२८ धावांचा पाठलाग करायचा होता. कर्णधार मिताली राज १३ व्या षटकात रनआउट होऊन माघारी परतली. त्यानंतर १६ चेंडूंमध्ये ११ धावांची आवश्यकता असताना शिखा पांडे रनआउट झाली आणि भारतीय संघाने हा सामना गमावला.

२०१९ - मँचेस्टर

तसेच २०१९ मध्ये झालेल्या रनआउटमुळे कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचे हृदय तुटले होते. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २०१९ वनडे विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना एमएस धोनी जबाबदारीने फलंदाजी करत भारतीय संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. मात्र त्याचवेळी ४९ व्या षटकात मार्टिन गप्टिलने बाउंड्रीलाईनवरून रॉकेट थ्रो फेकला आणि एमएस धोनी बाद होऊन माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT