hardik pandya saam tv
Sports

Hardik Pandya Statement: 'पराभव होणं चांगलंच..' लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पंड्याचे अजब-गजब वक्तव्य

IND vs WI 5th T20I: या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंंड्याने अजब-गजब वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya Statement On Defeat: भारत विरूद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम टी-२० सामना रविवारी फ्लोरिडाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यासह भारतीय संघाला ही मालिका २-३ ने गमवावी लागली आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने पराभवाचं कारण सांगत मोठं वक्तव्य केलं आहे.

हा सामना झाल्यानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, 'जेव्हा मी आलो तेव्हा आम्ही लय गमावली होती. आम्हाला परिस्थितीचा फायदा घेता आला नाही. आम्ही स्वत:ला आव्हान देत आणखी चागंलं करण्याचा प्रयत्न करत राहू. मला याबाबत जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. संघातील खेळाडू कसे आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. आमच्याकडे आता पुरेसा वेळ आहे. कधी कधी हरणं चांगलं असतं.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'आम्हाला खुप काही शिकायला मिळालं आहे. संघातील खेळाडूंनी चांगला खेळ केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. विजय पराभव होत राहतात. आगामी टी-२० वर्ल्डकप इथेच होणार आहे. मी अशी आशा करतो की, प्रेक्षक मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी येतील. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांचे मी आभार मानतो.' (Latest sports updates)

भारतीय संघाचा पराभव..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटक अखेर १६५ धावा केल्या होत्या.

यादरम्यान सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाकडून ब्रँडन किंगने नाबाद ८५ धावांची खेळी करून संघाला सामना जिंकून दिला. वेस्टइंडीजने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यासह ही मालिका ३-२ ने खिशात घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT