Shreya Maskar
कोकणाला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. पण येथे सुंदर धबधबे देखील पाहायला मिळतात. काही बारमाही वाहतात. सुट्टीत कोकण वारी करा.
मार्लेश्वर धबधबा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात, संगमेश्वर तालुक्यात, मारळ गावाजवळ आहे. तु्म्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
मार्लेश्वर धबधबा बारमाही वाहणारा धबधबा आहे. जो डोंगरांमध्ये वसलेल्या मार्लेश्वर मंदिराच्या जवळ वसलेला आहे. येथे एका गुहेत भगवान शिवाचे शिवलिंग आहे.
मार्लेश्वर धबधब्याजवळ स्वयंभू मार्लेश्वर मंदिर आहे. पावसाळ्यात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मंदिरात जाण्यासाठी अंदाजे ५०० पायऱ्या चढाव्या लागतात.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मार्लेश्वर धबधब्याला आवर्जून भेट द्या. रत्नागिरी स्टेशनला उतरून तुम्ही बस किंवा रिक्षाने मार्लेश्वर धबधब्यापर्यंत जाता येते.
मार्लेश्वर धबधबा सह्याद्रीच्या घनदाट कुशीत वसलेला एक निसर्गरम्य आणि प्रसिद्ध धबधबा आहे. उंचावरून कोसळणारे पाणी पाहून मन रिफ्रेश होते.
मार्लेश्वर धबधबा कोकणच्या सौंदर्यात भर घालतो. येथे नैसर्गिकाच्या सानिध्यात आध्यात्माचा अनुभव घेता येतो. तुम्ही येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.