Konkan Tourism : कोकणात गेल्यावर 'या' किल्ल्याला नक्की भेट द्या, खूप कमी लोकांना माहितेय

Shreya Maskar

फत्तेगड

फत्तेगड हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात, हर्णे गावाजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.

Fort | google

उद्देश काय?

फत्तेगड सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या तीन किल्ल्यांपैकी (फत्तेगड, गोवा किल्ला, कनकदुर्ग) एक आहे.

Fort | google

तटबंदी

सध्या फत्तेगड किल्ल्याचे फारसे अवशेष दिसत नाहीत. मात्र समुद्रकिनाऱ्याकडील तटबंदी दिसते. हे ऐतिहासिक वारसा जपणारे ठिकाण आहे.

Fort | google

सागरी किल्ला

फत्तेगड किल्ल्याच्या मूळ जागेवर आता कोळी बांधवांची वस्ती पाहायला मिळते. फत्तेगड किल्ला हा एक सागरी किल्ला (जलदुर्ग) आहे.

Fort | google

निसर्ग सौंदर्य

फत्तेगड येथून सह्याद्रीच्या रांगा आणि आसपासच्या निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते.विशेषतः सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहून मन भारावून जाते.

Fort | google

ट्रेकिंग

फत्तेगड खूपच कमी लोकांना माहित असलेला किल्ला आहे. हे ठिकाण आधी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध होते.

Fort | google

कोणी बांधला?

फत्तेगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर बांधला गेला, किंवा त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस बांधला गेला असावा.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : नवीन वर्षात इतिहासाची उजळणी, लहान मुलांसोबत नागपूरमधील 'या' किल्ल्याची करा सफर

Nagpur Tourism | yandex
येथे क्लिक करा...