hardik pandya practice twitter
Sports

T-20 World Cup 2024: 'ऑन नॅशनल ड्युटी...' टी-२० वर्ल्डकपसाठी हार्दिक अमेरिकेत दाखल

Hardik Pandya, T20 World Cup 2024: आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी हार्दिक पंड्या अमेरिकेत दाखल झाला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु झाल्यापासूनच हार्दिक पंड्या चर्चेचा विषय ठरतोय. या स्पर्धेत फ्लॉप कामगिरी केल्यानंतर त्याला ट्रोल केलं गेलं होतं. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर तो घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत आला. हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टानकोव्हिक यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान ही चर्चा सुरु असतानाच हार्दिक पंड्या अमेरिकेत दाखल झाला असून त्याने भारतीय संघासोबत सराव करायला सुरुवात केली आहे.

भारतीय संघातील खेळाडू २ गटात अमेरिकेला रवाना झाले. पहिल्या गटात रोहित शर्मा, रविंद्र जडेजा,कुलदीप यादव हे खेळाडू अमेरिकेत दाखल झाले. तर जे खेळाडू आयपीएल प्लेऑफ खेळण्यात व्यस्त होते. ते खेळाडू दुसऱ्या गटासह अमेरिकेसाठी रवाना झाले आहेत. मात्र हार्दिक पंड्या दोन्ही गटासोबत दिसून आला नाही. तो थेट लंडनहून अमेरिकेला गेल्याचं म्हटलं जात आहे.

अमेरिकेत दाखल होताच त्याने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हार्दिकने २९ मे रोजी सकाळी ७:५० मिनिटांनी फोटो शेअर केले आहेत . ज्यात अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या सराव करताना दिसून येत आहेत. या फोटोवर त्याने 'ऑन नॅशनल ड्युटी...' असं कॅप्शन दिलं आहे.

भारतीय संघाचा सराव सामना कधी?

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना २९ जून रोजी रंगणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सर्व संघ सराव सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. २७ मे ते १ जून दरम्यान सराव सामन्यांचा थरार रंगणार आहे. भारतीय संघाचा सराव साामना १ जून रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विराट कोहली खेळताना दिसून येणार नाहीये.

भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी भारतीय संघाचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना न्ययॉर्कमध्ये होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ १२ जून रोजी अमेरिका आणि १५ जून रोजी कॅनडासोबत दोन हात करताना दिसून येईल.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT