Shubman Gill  Saam TV
Sports

Shubman Gill New GT Captain : मुंबईने गुजरातच्या हार्दिकला खेचून आणलं, संघाची धुरा नवख्या शुभमन गिलकडे

IPL 2024 : शुभमन गिलची आयपीएलमधील कामगिरी पाहता गुजरातसाठी तो महत्त्वाची खेळाडू आहे. गिलने ३३ डावांमध्ये ४७.३४ च्या सरासरीने ३ शतके आणि ८ अर्धशतकांच्या मदतीने १३७३ धावा केल्या आहेत. मा

प्रविण वाकचौरे

Shubman Gill Gaujrat Titans New Captain :

आयपीएल २०२४ आधी अनेक मोठे फेरबदल समोर आले आहेत.  हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर गुजरात टायटन्सने संघाची धुरा शुभमन गिलकडे सोपवली आहे. गुजरात टायटन्सने म्हटले की, शुभमन गिल अशा संघाचं नेतृत्व करेल ज्यात अनुभव आणि तरुण उत्साह असं मिश्रण आहे, जे गुजरात टायटन्सचे वैशिष्ट्य आहे.

गिलची गुजरातकडून खेळताना कामगिरी

शुभमन गिलची आयपीएलमधील कामगिरी पाहता गुजरातसाठी तो महत्त्वाची खेळाडू आहे. गिलने ३३ डावांमध्ये ४७.३४ च्या सरासरीने ३ शतके आणि ८ अर्धशतकांच्या मदतीने १३७३ धावा केल्या आहेत. मागील हंगाम तर गिलने अक्षरश: गाजवला. त्याने ऑरेंज कॅप जिंकत 17 सामन्यात ५९.३३ च्या सरासरीने ३ शतके आणि ४ अर्धशतकांसह ८९० धावा केल्या. (Latest sports updates)

गिलची पहिली प्रतिक्रिया

शुभमन गिलने म्हटलं की, गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. इतक्या चांगल्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार मानतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शुभमन गिलची आयपीएल कारकीर्द

शुभमन गिलने २०१८ साली कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) आयपीएलमध्ये पदार्पण केले. गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत ९१ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३७.७० च्या सरासरीने २७९० धावा केल्या आहेत. या काळात त्याने ३ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली. आयपीएलमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या १२९ धावा आहे. IPL २०२३ च्या लिलावापूर्वी गिलला गुजरात टायटन्सने ८ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT