hardik pandya twitter
क्रीडा

Team India Celebration: वंदे मातरम सुरु असताना फॅनने हार्दिकच्या हातात फेकला टी-शर्ट, बुमराहने दिलेली रिॲक्शन व्हायरल

Ankush Dhavre

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी ३३ हजारांहून अधिक लोकांनी स्टेडियमच्या आत हजेरी लावली होती. तर याहून कितीतरी पट अधिक लोकांनी भारतीय संघाच्या विजयी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. २०११ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलचा सामनाही याच मैदानावर पार पडला होता.

या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. या विजयानंतर क्रिकेट फॅन्सने वंदे मातरम गायलं होतं. यावेळीही भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला आणि विजयाचा जल्लोष वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सोहळ्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने हजारो प्रेक्षकांसह मिळून वंदे मातरम गायलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारतीय संघातील खेळाडूंनी सपोर्ट केल्याबद्दल फॅन्सचे आभार मानले, त्यावेळी रोहित शर्मासह विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि इतर खेळाडूही होते. त्यावेळी हार्दिक पंड्या हात वर करुन वंदे मातरम गात होता. नेमकं त्याचवेळी प्रेक्षकांमधून कोणीतरी हार्दिक पंड्याच्या दिशेने टी शर्ट फेकलं. हे टी शर्ट हार्दिक पंड्याने कॅच केलं आणिे फेकून दिलं. हे पाहून जसप्रीत बुमराहला हसू आवरलं नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडू विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून येत आहेत. दरम्यान विराट कोहली म्हणाला की, ' मी गेल्या १५ वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. मी रोहितला इतकं भावुक कधीच पाहीलं नाही. जेव्हा मी पायऱ्या चढून वर जात होतो, त्यावेळी रोहित पायऱ्या उतरत होता. आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हा क्षण मी कधीच विसरु शकणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतचा संघर्षमय प्रवास, वाचा

Bhau Kadam : कॉमेडी किंग भाऊ कदमचा सिरियल किलर अंदाज, मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी पाहाच

SCROLL FOR NEXT