hardik pandya instagram
Sports

Hardik Pandya Viral Video: आजी-नातवाचा हटके अंदाज; 'श्रीवल्ली'वर भन्नाट डान्स, हार्दिकने शेअर केला VIDEO

Hardik Pandya Dance Video: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने श्रीवल्ली गाण्यावर डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा स्टार खेळाडू सध्या तुफान चर्चेत आहे. यावेळी चर्चेत असण्याचं काम, मैदानावरील कामगिरी नव्हे. तर निमित्त ठरतंय नताशा स्टॅनकोविकसोबत झालेला घटस्फोट. काही महिन्यांपू्र्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर हार्दिक पंड्याला ट्रोल केलं गेलं होतं. मात्र घटस्फोट झाल्यानंतर फॅन्स हार्दिक पंड्याला समर्थन करताना दिसून येत आहेत. नुकतेच हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हार्दिक पंड्या आपल्या आजीसोबत पुष्पा चित्रपटातील श्रीवली गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा नसून जुना आहे. मात्र नेटकरी या व्हिडिओवर अजूनही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. या व्हिडिओवर त्याने कॅप्शन म्हणून, 'हमारी अपनी पुष्पा नानी..' असं लिहिलं आहे.

व्हिडिओ तुफान व्हायरल

हार्दिक पंड्या या गाण्यावर डान्स करत असलेला पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी या गाण्यावर डान्स केला आहे. हे गाणं आणि या गाण्यातील स्टेप्सची क्रेझ काही कमी झालेली नाही. भारतात नव्हे, तर सातासमुद्रापारही हे गाणं सुपरहिट ठरलं. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने या गाण्यावर डान्स करत असतानाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. आता हार्दिकच्या व्हिडिओलाही तितकाच प्रतिसाद मिळत आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी त्याला मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळालं. त्यानंतर त्याला संघाचं कर्णधारपदही दिलं गेलं होतं. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. रोहतची जागा हार्दिकला दिली हे फॅन्सला अजिबातच आवडलं नव्हतं. त्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं होतं. मात्र आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत त्याने भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली. दरम्यान फायनलमध्ये त्याने निर्णायक षटक टाकलं आणि भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT