hardik pandya twitter
Sports

Hardik Pandya Record: पहिल्याच सामन्यात हार्दिक रचणार इतिहास! २ विकेट्स घेताच ५ गोलंदाजांना सोडणार मागे

India vs Ireland, Hardik Pandya Record: भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याकडे मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये आज (५ जून) रोमांचक लढत रंगणार आहे. हा भारतीय संघाचा आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील पहिलाच सामना असणार आहे. हा सामना न्युयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. हे दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळेस आमने सामने आले आहेत.

यादरम्यान भारतीय संघाने ७ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर १ सामना हा अनिर्णीत राहिला आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी सणार आहे.

हार्दिक पंड्याच्या नावावर होणार मोठ्या रेकॉर्डची नोंद

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत एकूण १३ गडी बाद केले आहेत. जर आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याने २ गडी बाद केले. तर तो मोठ्या रेकॉर्डमध्ये आरपी सिंग, मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, जोश डेवी आणि मोहम्मह हफीजला मागे सोडू शकतो. या सर्वा खेळाडूंनी आतापर्यंत १४-१४ गडी बाद केले आहेत. त्यामुळे १५ गडी बाद करताच तो या खेळाडूंना मागे सोडू शकतो.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गडी बाद करण्याची नोंद ही बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण ४७ गडी बाद केले आहेत. तर पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने या स्पर्धेत ३९ गडी बाद केले आहेत. तर श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने या स्पर्धेत ३८ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे.

आयर्लंडविरुद्ध होणारा सामना हा भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिलाच सामना असणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा सामना हा ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना देखील नासाऊ आंतरराष्ट्रीय काऊंटी स्टेडियमवर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगावमध्ये पावसाचे जोरदार आगमन

Shocking : २ वर्षांपूर्वी भरती; भाईंदरमध्ये नेमणूक, अवघ्या २४ वर्षांच्या पोलिसानं मृत्यूला कवटाळलं

Ajit Pawar: मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे- अजित पवार नेमकं काय म्हणाले? VIDEO

मुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक महिला आमदाराला भोवलं, पक्षप्रमुखांनी केली थेट बडतर्फीची कारवाई

Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT