hardik pandya and rohit sharma seen together in mumbai indians getaway trip video viral amd2000 yandez
Sports

Mumbai Indians: हार्दिक- रोहितमधला दुरावा संपला! आता मुंबई इंडियन्स धुरळा उडवणार

Rohit Sharma vs Hardik Pandya: हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा या दोन्ही संघांमध्ये दुरावा असल्याच्या चर्चा सुरु आहेत .दरम्यान मुंबई इंडियन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Rohit Sharma vs Hardik Pandya, Mumbai Indians:

हार्दिक पंड्या विरुद्ध रोहित शर्मा या दोघांमधीली वाद सध्या तुफान चर्चेत आहे. जेव्हापासून मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे, तेव्हापासून दोघांमध्ये दुरावा असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या सामन्यादरम्यान काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, जे पाहून असं वाटलं होतं की दोघांमधील दुरावा अजूनही कायम आहे.

याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाल्याचा पाहायला मिळाला आहे. ५ वेळचा मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेतील सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहेत. मुंबईची सुमार कामगिरी सुरु असताना, मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला दिलासा देणारा व्हिडिओ समोर आला आहे.

रोहित-हार्दिकचं भांडण मिटलं?

सामने आणि सरावातील थकवा घालवण्यासाठी खेळाडूंना गेट अवे ब्रेक दिला जातो. यादरम्यान संघातील खेळाडू एकत्र येतात. एकत्र वेळ घालवतात. थकवा दूर करतात आणि मौज-मस्ती करतात. त्यामुळे खेळाडूंचं बॉन्डींग आणखी चांगलं होतं. MITV वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रोहित आणि हार्दिक पंड्या हात मिळवणी करताना दिसून आले आहेत. (Cricket news in marathi)

हार्दिक- इशानची गळाभेट..

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिक पंड्या इशान किशनला मिठी मारताना दिसून येत आहे. यासह हार्दिक, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह एका जाहीरातीच्या शूटमध्ये एकत्र दिसून आले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू एकत्र मजामस्ती करताना दिसून आले.

मुंबईचा संघ कमबॅक करणार का?

मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. मात्र कमबॅक कसं करायचं हे या संघाला चांगलच माहित आहे. मुंबई इंडियन्सला या हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि आता राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी देखील २०१५ मध्ये झालेल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीचे ४ सामने गमावले होते. त्यानंतर कमबॅक करत मुंबई इंडियन्सने जेतेपदाला गवसणी घातली होती. असाच काहीसा कारनामा मुंबईचा संघ यावेळी ही करु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT