Hardik Pandya Saam Tv
क्रीडा

Hardik Pandya: अरे भाई नही...; हार्दिकला खरचं फिटनेसची चिंता की नखरे? पांड्याचा VIDEO व्हायरल

Hardik Pandya: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएलचा तारीख जाहीर होताच प्रकाश झोतात आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हार्दिकला खरचं फिटनेसची चिंता आहे की, तो नखरे करत आहे, हा प्रश्न केला जात आहे.

Bharat Jadhav

Hardik Pandya Video Viral IPL 2024 :

गुजरात टायटन्ससोडून मुंबईत कर्णधार पद घेणारा हार्दिक पांड्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आलाय. पायच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या बाहेर जाणारा हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. सध्या इंटरनेटवर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तो आपल्या फिटनेस बाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहे. परंतु त्याच्या या व्हिडिओवरून त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. हार्दिक खरचं फीटनेस चिंता करत आहे की, नखरे करत आहे असा प्रश्न केला जात आहे. (Latest News)

या व्हिडिओत हार्दिक पांड्या एका शूटवेळी सेटवर शेफ आणि न्युट्रिशनची मागणी करताना दिसतोय. तो गुजरातची शान असलेल्या जिलेबी आणि ढोकळ्याला नाकं मुरडताना दिसतोय. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी विविध कमेंट केल्यात. काही चाहते तर आयपीएलपूर्वीचा हा पीआर स्टंट असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएलचा तारीख जाहीर होताच प्रकाश झोतात आला आहे. आयपीएलचा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवलं आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम वादळी होणार, अशी शक्यता आहे.

दरम्यान, भारताचा माजी विकेटकिपर पार्थिव पटेलने आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना हार्दिक पांड्यावर मोठा दबाव असणार आहे असं म्हटलंय. 'हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी हा यंदाच्या हंगामात चर्चेचा विषय असणार आहे. ज्याप्रकारे त्याने गुजरात टायटन्सला पहिल्या वर्षी विजेतेपद पटकावून दिलं. पुढच्या वर्षी फायनलमध्ये शेवटपर्यंत सामना रंगला. त्याने चांगल्या प्रकारे गुजरात टायटन्सचे नेतृत्व केलं.

' 'हार्दिक आता पुढे गेलाय. तो मुंबईत परतला असून त्याने दुखापतीनंतर क्रिकेट खेळण्यास सुरूवात केलीय. त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण मुंबईला परत एकदा ट्रॉफी जिंकायची असल्याचं पार्थिव पटेल जिओ सिनेमावर बोलताना म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

SCROLL FOR NEXT