Harbhajan Singh prediction for winner of icc T20 World Cup 2024 amd2000 twitter
क्रीडा

T20 World Cup: टी -२० वर्ल्डकपपूर्वी हरभजन सिंगचं भाकीत! म्हणतो हा संघ जिंकणार ट्रॉफी

Ankush Dhavre

येत्या काही दिवसात टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी कोणते संघ टॉप ४ मध्ये जाणार आणि कोणते संघ फायनल गाठणार याबाबत भविष्यवाणी केली आहे. नुकताच भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग या संघाने देखील कोणता संघ टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.

हरभजन सिंगच्या मते, रोहित शर्मा एमएस धोनीने जे पहिल्याच हंगामात केलं होतं त्याची पुनरावृत्ती करू शकतो. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २००७ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. भारतीय संघ ही स्पर्धा जिंकणारा पहिलाच संघ ठरला होता. त्यावेळी भारतीय संघाने फायनलमध्ये पाकिस्तानला धूळ चारली होती.

काय म्हणाला हरभजन सिंग?

हरभजन सिंग म्हणाला की, ' एकटा रोहित शर्मा भारतीय संघाला जेतेपद मिळवून देऊ शकत नाही. हे सर्वांना मिळून करावं लागेल. सर्व एकजुटीने खेळले तर तुम्ही काहीही मिळवू शकता. भारतीय खेळाडू गेल्या काही दिवसांपासून आयपीएल स्पर्धेत खेळत आहेत. याचा थकवा आणि थकव्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होऊ शकतो.'

तसेच खेळपट्टीबाबत बोलताना तो म्हणाला की, ' खेळपट्टी कशी असेल हे कोणालाच माहित नाही. सराव सामन्यात कॉम्बिनेशन कसं असेल यावरून अंदाज येईल. तसेच एस श्रीसंथ म्हणाला की, २ फिरकी गोलंदाज आपली ताकद आहे. २ वेगवान गोलंदाज आणि हार्दिक पंड्या आमचा तिसरा वेगवान गोलंदाज आहे. भारतीय संघाची फलंदाजी देखील मजबूत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT