Happy Birthday Yuvraj Singh/Instagram- yuvisofficial SAAM TV
Sports

Yuvraj Singh : युवराजची संपत्ती किती? तो नक्की काय करतो आणि किती आहे त्याची कमाई?

Yuvraj Singh: क्रिकेटमधून संन्यास तरीही कोट्यवधींचा मालक, 'या' व्यवसायातून युवराज करतो बक्कळ कमाई

Saam TV News

भारतीय क्रिकेटमधील माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा आज वाढदिवस. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी युवराज क्रिकेट विश्वात प्रसिद्ध होता. आपल्या जिगरबाज खेळीने एकहाथी सामना फिरवण्यात युवराज सिंगचा हातखंडा होता.

युवराजच्या याच जिगरबाज खेळीच्या जोरावर अनेक विजय मिळवले. क्रिकेटसोबतच युवराज त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलमुळेही नेहमी चर्चेत असतो. क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली असली तरी युवराज आजही कोट्यवधींची कमाई करत असतो. आज (१२, डिसेबर) युवराज सिंगचा वाढदिवस. जाणून घेऊयात युवराजच्या एकूण संपत्तीबद्दल. (Yuvraj Singh

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक युवराज सिंग सोमवारी 41 वर्षांचा झाला. या डावखुऱ्या फलंदाजाने क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम केले आहेत. यासोबतच तो कमाईच्या बाबतीतही पुढे आहे. म्हणूनच जगभरातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत युवराज सिंगच्या नावाचा समावेश होतो.

कमाईबद्दल बोलायचे झाले तर युवराज सिंगने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कामगिरीने भरपूर संपत्ती कमावली आहे. याशिवाय तो अनेक प्रसिद्ध ब्रँडशीही जोडला गेला आहे. रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंगची एकूण संपत्ती $35 दशलक्ष म्हणजेच जवळपास 289 कोटी रुपये आहे. तर, त्याची वैयक्तिक मालमत्ता सुमारे 50 कोटी रुपयांची आहे.

युवराजचा जन्म 12 डिसेंबर 1981 रोजी चंदिगढच्या एका पंजाबी कुटुंबात झाला. 2003 ते 2017 या काळात तो भारतीय संघाचा सदस्य होता. तसेच पेप्सी, बिर्ला सन लाइफ, रिबॉक, प्यूमा, कॅडबरी, व्हर्लपूल, रॉयल मेगा स्टॅग, एलजी, रिव्हिटल यासह अनेक ब्रँडशी तो जोडला गेला होता. याशिवाय त्याने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

युवराजने अनेक स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे, ज्यातून त्याला भरपूर पैसे मिळतात. यासोबतच तो जाहिरातींमधूनही बक्कळ कमाई करतो. युवराजने स्वतःचे फिटनेस सेंटर आणि स्पोर्ट्स सेंटरही सुरू केली आहेत.

Edited By- Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT