Happy Birthday Yuvraj Singh/file
Happy Birthday Yuvraj Singh/fileSAAM TV

Yuvraj Singh Birthday: तीन -तीन विश्वचषकांचा हिरो ते कॅन्सरवर मात, असा घडला 'जिगरबाज' युवराज

Happy Birthday Yuvraj Singh : युवराजने सध्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याने खेळलेल्या तुफानी खेळींची क्रिकेटप्रेमींमध्ये आजही चर्चा रंगलेली असते.
Published on

युवराज सिंग हे नाव माहीत नसेल असा एकही क्रिकेटवेडा तरूण शोधूनही सापडणार नाही. २००० साली झालेला १९ वर्षांखालील विश्वचषक त्यानंतर २००७ आणि २०११ साली भारताने जिंकलेल्या दोन्ही विश्वचषकांचा हिरो म्हणून युवराजचे नाव घेतले जाते.

भारताचा स्फोटक फलंदाज आणि गोलंदाज म्हणून युवराजने प्रचंड लोकप्रियता मिळवली. युवराजने सध्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याने खेळलेल्या तुफानी खेळींची क्रिकेटप्रेमींमध्ये आजही चर्चा रंगलेली असते. आज (१२, डिसेंबर) युवराज सिंगचा वाढदिवस. जाणून घेऊया त्याच्या संघर्षमय प्रवासाबद्दल. (Yuvraj Singh)

Happy Birthday Yuvraj Singh/file
Yuvraj Singh : युवराज सिंग अडचणीत, चुकवावी लागू शकते मोठी किंमत; काय आहे नेमके कारण?

'सिक्सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराज सिंगचा जन्म १२ डिसेंबर १९८१ ला झाला. भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक मिळवून दिल्यानंतर युवराज प्रकाशझोतात आला. या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करत युवराजने मालिकावीरचा किताब पटकावला. इथूनच युवराजच्या यशस्वी कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. ऑक्टोबर २००० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. (Cricket News)

१२ चेंडूत अर्धशतक

युवराज सिंगला सिक्सर किंग म्हणून ओळख मिळाली ती २००७ च्या विश्वचषकातून. या विश्वचषकाचा हिरो ठरलेल्या युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग सहा षटकार लगावत खळबळ माजवली होती.

Happy Birthday Yuvraj Singh/file
IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा इशान किशन होतोय ट्रोल; नेटकरी म्हणाले, ५० रुपयालाही मिळते 'ओपनर'

या सामन्यात युवराजने फक्त १२ चेंडूत ५० धावा करत सर्वात जलद अर्धशतक झळकावले. २००७ प्रमाणेच २०११ च्या विश्वचषकाचाही युवराज हिरो ठरला. या मालिकेत युवराजने ३६२ धावा कुटत १५ बळी घेतले होते. युवराजच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याने मालिकावीरचा मानही मिळवला होता. मात्र विश्वचषकातील वादळी खेळीनंतर युवराजच्या खऱ्या आयुष्यातही एक वादळ आले.

कॅन्सरचे निदान

आपल्या तुफानी फलंदाजीने क्रिकेट विश्वात यशाचे शिखर गाठत असतानाच युवराजला कॅन्सरचे निदान झाले अन सर्वांना धक्का बसला. २०११ च्या विश्वचषकानंतर युवराजला कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या जीवघेण्या आजारावर युवराजने अमेरिकेत उपचार घेतले. पुन्हा मैदानावर पुनरागमन केले.

२०१७ पर्यंत युवराज क्रिकेट खेळत राहिला. परंतु लय हरवल्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर २०१९ मध्ये युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 402 आंतरराष्ट्रीय सामने, 11,778 धावा, 17 शतके आणि 148 विकेट्स असा थक्क करणारा प्रवास आपल्या कारकिर्दित युवराजने केला.

Edited By - Gangappa Pujari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com