Yuvraj Singh : युवराज सिंग अडचणीत, चुकवावी लागू शकते मोठी किंमत; काय आहे नेमके कारण?

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग अडचणीत सापडला आहे. काय आहे नेमके कारण?
Yuvraj Singh/File Photo
Yuvraj Singh/File PhotoSAAM TV
Published On

Yuvraj Singh News : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग अडचणीत सापडला आहे. गोव्यातील बंगल्यामुळं तो भलत्याच संकटात सापडला आहे. अलीकडेच त्यानं हा बंगला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचा हॉलिडे होम कासा सिंगमध्ये राहू शकता, असं खुलं निमंत्रण त्यानं चाहत्यांना दिलं होतं. या खुल्या ऑफरनंतर युवराज सिंगला नोटीस पाठवण्यात आली आहे. गोवा पर्यटन विभागाकडून त्याला ही नोटीस बजावली आहे. विनापरवानगी बंगला भाडेतत्वावर देऊ शकत नाही, असं या नोटिशीत नमूद केले आहे.

युवराज सिंगचा (Yuvraj Singh) बंगला गोव्यातील मोरजिममध्ये आहे. चपोरा नदीच्या काठावर कासा सिंग नावाचा हा बंगला युवराज सिंगच्या क्रिकेटशी संबंधित आठवणींशी जोडलेला आहे. मात्र, या बंगल्यावरून गोवा पर्यटन विभाग युवराज सिंगवर नाराज आहे.

Yuvraj Singh/File Photo
चाहत्यांच्या आग्रहास्तव युवराज सिंग पुन्हा उतरणार मैदानात; केली मोठी घोषणा

८ डिसेंबरला हजर हो, नाही तर मोठा दंड भरावा लागेल

युवराज सिंगला नोटीस बजावल्यानंतर पर्यटन विभागानं त्याला ८ डिसेंबरला विभागाचे उपसंचालकांसमोर हजर होण्यास सांगितले आहे. या सुनावणीसाठी हजर झाला नाही तर त्याला १ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. पर्यटन विभागाकडून अशा प्रकारची कारवाई केवळ युवराज सिंगवर केली आहे, असं नाही. तर, यापूर्वीही अनेक प्रकरणात पर्यटन विभागानं कारवाई केली आहे. (Goa News)

Yuvraj Singh/File Photo
...म्हणून मी २००७ मध्ये टीम इंडियाचा कर्णधार झालो नाही; युवराज सिंगने केला खुलासा

१ लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो

पर्यटन विभागाकडून रजिस्ट्रेशन न करता आपली मालमत्ता भाडेतत्वावर देणाऱ्यांविरोधात अशा प्रकारची कारवाई केली जाते. हा आमच्या मोहिमेचा एक भाग आहे, असं विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यटन विभागाकडून गेल्या महिनाभरात ४०० लोकांना अशा प्रकारच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

नोटिसा बजावल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून नियमांची पायमल्ली करण्याचे काम अनेकांकडून केले जात आहे. मात्र, अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक लाख रुपये दंड आकारला जाईल, असे विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com