hanuma vihari  saam tv
Sports

Hanuma Vihari Statement: मला बाहेर का केलं? BCCIकडून सतत डावलल्याने हनुमा विहारी भावुक, म्हणाला...

Hanuma Vihari Emotional Statement: हनुमा विहारी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Hanuma Vihari On Indian Team Comeback: भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज हनुमा विहारी गेल्या काही महिन्यांपासुन संघाबाहेर आहे. सिडनीच्या मैदानावर झालेला सामना वाचवण्यासाठी त्याने आर अश्विनसोबत मिळून ३ तास फलंदाजी केली होती.

मात्र दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. तो भारतीय संघात कमबॅक करू शकेल का? असा प्रश्न उपस्थित होत असताना आता अखेर हनुमा विहारी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हनुमा विहारीने म्हटले की, 'मी चढ उतार पाहिले आहेत. यापूर्वी देखील माझ्या आयुष्यात अनेकदा चढ उतार आले आहेत. मात्र मला याची कधीच चिंता वाटली नाही.

मी माझ्या वैत्यक्तिक बाबी बाजूला ठेवल्या आहेत,मी या गोष्टींचा जास्त विचार करत नाही. मी भारतीय संघासाठी खेळतोय की नाही, या गोष्टीचा तर मी स्वतःवर मुळीच दबाव येऊ देत नाही. मी सध्या दिलीप ट्रॉफीत साऊथ झोन संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या संघासाठी ट्रॉफी जिंकणं हेच माझं लक्ष्य आहे.' (Latest sports updates)

भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत बोलताना काय म्हणाला?

संघाबाहेर असूनही हनुमा विहारीचे भारतीय संघात कमबॅक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने अजिंक्य रहाणेचं उदाहरण दिलं होतं. त्याने म्हटले होते की, मी तर २९ वर्षांचा आहे. अजिंक्य रहाणेने ३५ व्या वर्षी कमबॅक केले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. यासह तो म्हणाला आहे की, माझ्यात खूप क्रिकेट शिल्लक आहे.मात्र पुनरागमनाची वाट सोपी मुळीच नसणार आहे.

तसेच तो पुढे म्हणाला की, 'मला संघाबाहेर का केलं गेलं याचं कारण मला माहित नाही. याच गोष्टीची मला नेहमी खंत वाटते.' हनुमा विहारी २०२२ मध्ये बर्मिंगहॅमच्या मैदानावर आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर तो भारतीय संघात कमबॅक करू शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT