National Games, Gujarat, Indian Olympic Association saam tv
Sports

आयओएचा गाेवा सरकारला दणका; नॅशनल गेम्स आयाेजनाचे ठिकाण बदलले; जाणून घ्या नवे ठिकाण

भारतीय ऑलिंपिक संघटनेने स्पर्धेचे यजमानपद गुजरातला दिले.

Siddharth Latkar

मुंबई : भारतीय ऑलिंपिक संघटनेने (Indian Olympic Association) 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National Games 2022) आयोजनाची जबाबदारी गुजरात राज्यास दिली. यंदा ही स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर कालावधीत हाेईल. गुजरात ऑलिंपिक संघटना आणि गुजरात सरकारने आयओएला स्पर्धा आयाेजनात काेठेही कमतरता भासणार नाही अशी ग्वाही दिली. आयओए सचिव राजीव मेहता यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (36th National Games) आयाेजनाचा मान गुजरातला (gujarat) दिला. यापुर्वी ही स्पर्धा गाेव्यात (Goa) हाेईल असे सांगितलं जात हाेते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे तेथे आयाेजन करणे शक्य होणार नसल्याची माहिती समाेर आल्याने आयओएने निर्णय बदलला. (National Games 2022 Latest Marathi News)

ही स्पर्धा गुजरातमधील राजकोट (rajkot), सूरत (surat), भावनगर (bhavnagar), बडोदा (baroda) या विविध ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केले जाईल. स्पर्धेचे उद्घाटन आणि सांगता समारंभ मोटेरा (अहमदाबाद) येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (narendra modi stadium) होईल.

गुजरातला यजमानपद देण्यापुर्वी ही स्पर्धा गाेव्यात हाेईल अशी शक्यता वर्तविण्यात येत हाेती. गाेवा सरकारने देखील त्यासाठी तयारी केली हाेती. मात्र तेथील पावसाचे प्रमाण तसेच स्पर्धेचे तयारीसाठी करण्यात येणारी मैदान यासाठी लागणार वेळ याचा विचार करुन गाेवा सरकाराने आयओएला आणखी पाच महिन्यांचा अवधी द्यावा असा अहवाल पाठविला हाेता.

दरम्यान गोवा राज्य सरकारने यापुर्वी देखील स्पर्धा लांबणीवर टाकली हाेती. त्यामुळे आयओएने यापुर्वीचा अनुभव लक्षात घेता यंदाची स्पर्धा गुजरातला देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आगामी काळातील खेलाे इंडिया स्पर्धा आयाेजनाचा मान गाेव्यास मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT