IPL 2024 News: DC won by 6 wickets against Gujrat Titans IPL 2024
IPL 2024 News: DC won by 6 wickets against Gujrat Titans IPL 2024 Saam TV
क्रीडा | IPL

IPL 2024, GT vs DC: क्या बात क्या बात! गुजरातला नमवत दिल्लीचा मुंबईलाही धोबीपछाड; विजयानंतर Points table मध्ये मोठी उलटफेर

Bharat Bhaskar Jadhav

Updated IPL 2024 Point Table:

आयपीएल २०२४ च्या ३२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सने दारूण पराभव केला. गुजरातला अवघ्या ८९ धावांमध्ये रोखल्यानंतर दिल्लीचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यास मैदानात उतरला. अवघ्या ८९ धावांचे आव्हान पार करताना दिल्लीने ४ गडी गमावलेत.

पाचव्या विकेट फलंदाजी करताना ऋषभ पंतने आणि सुमित कुमारने नाबाद खेळी करत संघला विजय मिळवून दिला. दरम्यान आज आयपीएल २०२४ मधील निचांक खेळीची नोंद आज झाली आणि गुजरात टायटन्सवर हा नकोसा विक्रम नोंदवला गेला. गुजरात संघाला फक्त ८९ धावांत तंबूत पाठवल्यानंतर दिल्लीने हे लक्ष्य ८.५ षटकांत सहज पार केले.

दिल्लीने ८.५ षटकांत ४ बाद ९२ धावा केल्या. या विजयानंतर दिल्लीने पॉईट्स टेबलमध्ये थेट ९व्या क्रमांकावरून थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतलीय. गुजरातला नेट रन रेटच्या जोरावर मागे ढकलले. या गुणतालिकेत पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी घेणारा मुंबईचा संघाला देखील दिल्लीने पिछाडलंय.

दिल्लीचे सलामीवीर फलंदाजच हा सामना जिंकून देतील असं वाटत होतं. दोन्ही सलामीवीर बाद झाले. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅकगर्क झेलबाद झाला. मॅकगर्कनंतर पृथ्वी शॉही बाद झाला. मॅकगर्कने १० चेंडूत २० धावा केल्या. त्याच्यानंतर पृथ्वी शॉ बाद झालेल्या पृथ्वीने ६ चेंडूत ७ धावा केल्या. याच्यानंतर शे होप व अभिषेक पोरेल यांनी ४,४,४,६,६,१,६ अशी फटकेबाजी करून दिल्लीला पुन्हा विजयपथावर आणले पण, संदीपने पोरेलला परत माघारी पाठवले. परंतु दिल्लीने पॉवर प्लेमध्ये ४ बाद ६७ धावा उभ्या केल्या. रिषभने फटकेबाजी करून सामना ९व्या षटकात संपवला. दिल्लीने ६ विकेट्सने हा सामना जिंकला

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सचा संघ ८९ धावांत गारद झाला. गुजरातचा संपूर्ण संघ केवळ १७.३ षटकेच खेळू शकला. शुबमन गिल ८, वृद्धीमान सहा २, साई सुदर्शन १२ आणि डेव्हिड मिलर २ धावा करून हे खेळाडू पॉवर प्लेमध्येच माघारी परतले. सुमित कुमारने क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवताना साईला रन आऊट केले, ऋषभ पंतने अप्रतिम झेल घेत मिलरला माघारी पाठवले. त्यानंतर अभिनव मनोहर ( ८) व इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या शाहरुख खानही कमाल करू शकला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

SCROLL FOR NEXT