GT VS DC IPL 2025 : शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. साई सुदर्शन आणि शुबमन गिल ही सलामीची जोडी शेवटपर्यंत टिकून राहिली. दोघांनी मिळून गुजरातला विजय मिळवून दिला. दिल्लीचे यंदाच्या सीझनमधील आव्हान संपल्याचे म्हटले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजराच्या या विजयामुळे गुजरात, बंगळुरू आणि पंजाब हे ३ संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत.
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध गुजरात हा सामना खेळला गेला. शुबमन गिलने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीसाठी उतरलेल्या केएल राहुलने शतकीय खेळी केली. त्याने ११२ धावा केल्या. अभिषेक पोरेल (३०), अक्षर पटेल (२५) व त्रिस्तान स्तब्स (२१*) यांच्यामुळे दिल्लीने १९९ धावा केल्या.
२०० धावांचे आव्हान गुजरातच्या सलामीवीरांना पेलले. शुबमन गिलने ९३ धावा तर साई सुदर्शनने १०८ धावा केल्या. विशेष म्हणजे दोघेही नाबाद राहिले. गुजरातची एकही विकेट पडली नाही. एकूणच या विजयामुळे गुजरातचा नेटरनरेट वाढला, गुजरातसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये गेले.
आयपीएल २०२५ मधील प्लेऑफसाठी ३ संघ क्वालिफाय झाले आहे, तर चौथ्या जागेसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात संघर्ष आहे. १४ गुणांसह मुंबई चौथ्या, तर १३ गुणांसह दिल्ली पाचव्या स्थानावर आहे. तेव्हा या दोघांपैकी एक संघ क्वालिफाय होऊ शकतो अशी शक्यता आहे. मुंबईने पुढील दोन्ही सामने जिंकले तर ते १८ गुणांसह प्लेऑफमध्ये क्वालिफाय करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.