Malegaon: मालेगावमध्ये तुफान राडा, महिला अन् तरुणांकडून दुकानाची तोडफोड; VIDEO व्हायरल

Malegaon Crime: मालेगावमध्ये काही महिला आणि तरुणांनी एका घड्याळाच्या दुकानाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

नाशिकच्या मालेगावमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. मालेगावच्या किदवाई रोडवर काही तरुण आणि महिलांनी हातात काठ्या घेऊन घड्याळाच्या एका दुकानावर हल्ला करून तोडफोड केली. हातामध्ये काठ्या आणि रॉड घेऊन दुकानातील सर्व घडाळं फोडण्यात आली. या घटनेच घड्याळाच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाजारपेठेत भीती पसरली होती. ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या राड्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मालेगाव पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. या तरुण आणि महिलांनी दुकानाची तोडफोड का केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com