team india  twitter
क्रीडा

IND W vs SL W: टीम इंडियासाठी गुड न्यूज! महत्वाच्या सामन्यात स्टार खेळाडू खेळणार; उप-कर्णधाराने दिली मोठी अपडेट

Harmanpreet Kaur Update: आज भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये महत्वाचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

India Womens vs Sri Lanka Womens, Harmanpreet Kaur: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील गेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला होता. या विजयानंतर भारतीय संघाने या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं.

तर मंगळवारी (८ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दरम्यान आज होणारा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात हरमनप्रीत कौरने निर्णायक खेळी केली होती. मात्र शेवटी तिला दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यानंतर ती पुढील सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. हरमनप्रीत पूर्णपणे फिट असून ती श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे.

भारतीय संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला ५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय संघ नेट रन रेटच्या बाबतीतही बराच मागे पडला होता.

त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केलं आणि शानदार कमबॅक केलं. आज होणाऱ्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करुन भारतीय संघाकडे टॉप २ मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. मात्र यासह भारतीय संघाला नेट रनरेट वाढवण्यावरही भर द्यावा लागणार आहे.

स्म्रिती मंधानाने दिली अपडेट

हरमनप्रीत कौरच्या फिटनेसबाबत बोलताना स्म्रिती मंधाना म्हणाली की, ' हरमनप्रीत कौर फिट आहे. ती उद्या होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे.' हरमनप्रीत कौर खेळणं ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब आहे. कारण सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल, तर भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT