आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाचा दमदार शो सुरु आहे. या स्पर्धेतील सुरुवाचीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ सेमीफायन खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
मात्र सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कोणत्या संघाविरुद्ध खेळणार, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दरम्यान ही स्पर्धा सुरु असताना भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजीचा सराव करण्यासाठी मैदानात उतरला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीदरम्यान जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आलं होतं. दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही त्याची निवड करण्यात आली नव्हती.
गेल्या महिन्याभरापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या जसप्रीत बुमराहने आता मैदानात उतरुन गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,तो त्याच जोशात गोलंदाजी करत आहे. मात्र ४ मार्चआधी त्याची भारतीय संघात एन्ट्री होणं कठीण दिसून येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार,तो येत्या २२ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतून कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. मात्र शेवटच्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं.
त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र तो पूर्णपणे फिट न झाल्याने त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जसप्रीत बुमराहचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. चाहत्यांच्या मते, बुमराहने सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघात कमबॅक करावं. मात्र हे अशक्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.