viral video twitter
Sports

Viral Cricket Video: १२ वर्षीय सुशीलाची जादुई गोलंदाजी; क्रिकेटच्या देवाने दिली दाद -VIDEO

Sachin Tendulkar Viral Video: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Ankush Dhavre

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राजस्थानच्या १२ वर्षीय मुलीच्या गोलंदाजीचा फॅन झालाय. राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात राहणाऱ्या सुशीला मीणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

जहीर खानसारखी गोलंदाजी अॅक्शन असलेल्या या तरुणीच्या गोलंदाजीचा सचिन तेंडुलकरही फॅन झाला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर केलाय आणि तू हिची गोलंदाजी पाहिली का? असा प्रश्व जहीर खानला विचारला आहे. या युवा गोलंदाजाची गोलंदाजी अॅक्शन ही हुबेहूब जहीर खान सारखीच आहे.

एखादा युवा खेळाडू चांगली गोलंदाजी करत असेल किंवा फलंदाजी करत असेल त्याचा प्लॅटफॉर्म देण्याचं काम हा सचिन तेंडुलकर करत असतो. यापूर्वीही सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन युवा खेळाडूंचा व्हिडिओ शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. आता त्याने एका लहान मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पायात शूज किंवा चप्पल नाही,पण एकदम क्लिन रनअप आणि हुबेहूब जहीर खानसारखी गोलंदाजी पाहून सचिनही तिचा जबरा फॅन झाला आहे. सुशीलाबद्दल सांगायचं झालं, तर ती अत्यंत गरीब कुटुंबातून आहे. तिचे आई-वडील हातमजूरी करतात. तिच्या आईचं नाव शांती बाई मीणा असं आहे. तर तिच्या वडिलांचं नाव, रतनलाल मीणा असं आहे.

सचिन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या युवा गोलंदाजाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करत जहीर खानला टॅग केलं आहे. यासह त्याने या व्हिडिओला हटके कॅप्शनही दिलं आहे. सुशीलाची गोलंदाजी एकच नंबर आहे .

तिला योग्य प्रशिक्षण मिळालं, तर ती आणखी पुढे जाऊ शकते. सुशीला शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेत असते. तिचा हा व्हिडिओ एका युझरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता.

या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्स करताना दिसून येत आहे. ही युवा खेळाडू एक दिवशी नक्की भारतीय संघासाठी खेळणार, अशा कमेंट्स नेटकरी करताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT