navjot singh sidhu ambati rayudu x
Sports

IPL 2025 : 'सरड्या' वरून राडा! नवज्योतसिंग सिद्धू अन् अंबाती रायुडू Live Tv वर भिडले; कॉमेंट्री बॉक्समधील Video Viral

PBKS VS CSK : पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यादरम्यान नवज्योत सिंग सिद्धू आणि अंबाती रायडू यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धू रायडूला उद्देशून 'सराडा तुझे आराध्य आहे', असे वक्तव्य केले.

Yash Shirke

IPL 2025 मधला २२ वा सामना पंजाब किंग्स चेन्नई विरुद्ध सुपर किंग्स खेळला गेला. कालच्या सामन्यात पंजाब किंग्स विजयी झाले. पंजाब किंग्सचा तरुण फलंदाज प्रियांश आर्याने शतकीय कामगिरी केली. पुढे चेन्नई सुपर किंग्सला २२० धावांचे लक्ष गाठता आले नाही. सीएसकेचा १८ धावांनी पराजय झाला. या पराभवामुळे चेन्नईचा संघ पॉइंट्स टेबलवर ९ व्या क्रमावर गेला आहे.

पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स हा सामना सुरु असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि अंबाती रायडू यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यापेक्षा सिद्धू आणि रायडूच्या भांडणाची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू आणि अंबाती रायडू यांच्यांमध्ये सामन्याबाबतची चर्चा सुरु होती. एका गोष्टीवरुन अंबाती रायडूने सिद्धू यांना टोकले आणि तुम्ही टीम बदलत आहात असे वक्तव्य केले. यावरुन नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील पलटवार केला. ते म्हणाले, 'ही चुकीची गोष्ट आहे. जर सराडा कोणाचे आराध्य दैवत असेल, तर ते तुझं असेल.'

सिद्धू आणि रायडूच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांनी अंबाती रायडूसह एमएस धोनीवर देखील निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे. सामन्याचे समालोचन करत असताना अंबाती रायडू सतत धोनीचे कौतुक करत असतो. त्यावरुन अप्रत्यक्षपणे सिद्धू यांनी रायडूला टोला लगावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT