Gerald coetzee breaks the record of mayank yadav bowls the fastest ball in ipl 2024 against rajasthan royals amd2000 twitter
Sports

Fastest Ball In IPL 2024: मयांक यादवचा रेकॉर्ड मोडला! मुंबईच्या गोलंदाजाने टाकला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू

Gerald Coetzee Breaks Mayank Yadav Record: या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करत ३ गडी बाद केले. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

IPL 2024 Fastest Ball, Gerald Coetzee:

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला सलग तिसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून, दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून आणि तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करत ३ गडी बाद केले. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.

गेराल्ड कोएत्जीने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळताना आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. यासह त्याने लखनऊ सुपरजायंट्स संघातील गोलंदाज मयांक यादवचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. गेराल्ड कोएत्जीला या सामन्यात गोलंदाजी करताना आपली छाप सोडता आली नाही. २.३ षटकात त्याने ३६ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने ताशी १५७.४ किमी गतीने चेंडू टाकला. हा आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. यासह त्याने मयांक यादवचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

मयांकच्या नावे होता रेकॉर्ड...

लखनऊ सुपर जायंट्स संघातील २१ वर्षीय वेगवान गोलंदाज मयांक यादवने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या बुलेट स्पीड गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. त्याच्या गोलंदाजीची गती पाहून फलंदाजी करत असलेला शिखर धवन देखील अवाक झाला होता. आपल्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच स्पेलमध्ये त्याने एकुण एक चेंडू ताशी १४० च्या पुढचा टाकला होता. त्याने वैयक्तिक दुसऱ्याच षटकातील पहिला चेंडू हा ताशी १५५.८ च्या गतीने टाकला. हा आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू ठरला होता. (Cricket news in marathi)

शॉन टेटचा रेकॉर्ड थोडक्यात हुकला..

गेराल्ड कोएत्जीकडे आयपीएल २०२४ स्पर्धेतील एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी होती. त्याला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज बनण्याची संधी होती. मात्र ही संधी थोडक्यात हुकली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड हा शॉन टेटच्या नावावर आहे. त्याने ताशी १५७.७१ च्या गतीने चेंडू टाकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT