रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड विरूद्ध दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान यानंतर आता टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला ५ सामन्यांची सिरीज खेळायची आहे. मात्र न्यूझीलंडने केलेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरला टार्गेट केलं जात असून त्यावर टीका कऱण्यात येतेय. अशातच समोर आलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गौतम गंभीरची कोचपदाची हकालपट्टी केली जाऊ शकते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल गाठण्यासाठी ही टेस्ट सिरीज महत्त्वाची मानली जातेय. जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सिरीज 4-0 ने जिंकली तर आपण अंतिम फेरीत पोहोचेल. मात्र हे सोप्प नाहीये. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा एक अग्निपरीक्षा असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर गौतम गंभीरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. गंभीरने चार महिन्यांपूर्वी मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतली होती. पण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेच्या पहिल्या दौऱ्यावर वनडे सिरीज गमावली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाची कामगिरी खराब राहिल्यास गंभीरला टेस्ट क्रिकेटमधील मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवलं जाण्याची शक्यता आहे. गंभीर सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय टीमचा मुख्य कोच आहे. मात्र एका रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता पांढऱ्या बॉलसाठी (ODI, T20) आणि रेड बॉल क्रिकेटसाठी स्वतंत्र कोच नियुक्त करण्याचा विचार करतं. टेस्ट क्रिकेटमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या दिग्गजाला मुख्य प्रशिक्षक बनवलं जाण्याची शक्यता आहे. तर गौतम गंभीर व्हाईट बॉलच्या टीमचा मुख्य प्रशिक्षक राहू शकतो.
याशिवाय पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर बीसीसीआयकडून आढावा बैठक घेण्यात आली. कर्णधार रोहित शर्मासह मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य कोच गंभीर, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी या बैठकीमध्ये उपस्थित होते. न्यूझीलंड सिरीज दरम्यान टीम मॅनेजमेंटने घेतलेल्या काही निर्णयांवर प्रश्न विचारण्यात आले.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल. (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.