gautam gambhir on rinku singh  saam tv
Sports

Gautam Gambhir On Rinku Singh: LSG चा घाम काढणाऱ्या रिंकूचा जबरा फॅन झालाय Gambhir; ट्विट करत केला कौतुकाचा वर्षाव

Gautam Gambhir Tweet: या सामन्यात तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंगचे गौतम गंभीरने तोंडभरून कौतुक केले आहे.

Ankush Dhavre

Rinku Singh Batting : आयपीएल २०२३ स्पर्धेत शनिवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात असे वाटू लागले होते की, लखनऊ सुपर जायंट्स संघ या सामन्यात एकतर्फी विजय मिळवणार.

मात्र शेवटी रिंकू सिंगने तुफानी खेळी करत शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नेला. मात्र शेवटी कोलकाता नाईट रायडर्स संघाला या सामन्यात १ धावेने परभावाचा सामना करावा लागला.

दरम्यान या सामन्यात तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंगचे गौतम गंभीरने तोंडभरून कौतुक केले आहे.

सामन्यानंतर गौतम गंभीरचे रिंकू सिंगसाठी खास ट्विट..

लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्व झालेल्या सामन्यात रिंकू सिंगने दाखवून दिलं की, तो कोणापेक्षा कमी नाहीये. त्याने या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत, नाबाद ६७ धांवाची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर त्याने जवळजवळ लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून विजय खेचून आणला होता . शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१ धावांची गरज होती. वैभव अरोडाने पहिल्या चेंडूवर १ धाव घेतली.

त्यांनतर दुसऱ्या आणि तिसरा चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर चौकार मारला. तो इथेच थांबला नाही तर त्याने शेवटच्या चेंडूवरही षटकार मारला. मात्र विजय १ धावेने दूर राहिला.

रिंकू सिंगचे कौतुक करत गौतम गंभीरने म्हटले की, रिंकू सिंग ही नेव्हर गिव्ह अपचं प्रतिक आहे. आश्चर्यकारक हंगाम आणि आश्चर्यकारक कथा... मला खूप आनंद होत आहे की, त्याच्या मेहनतीचे नक्कीच फळ मिळत आहे आणि जगाने त्याची प्रतिभा पाहिली आहे. त्यांच्या जिद्द आणि लढाऊ भावनेला मी सलाम करतो..' (Latest sports updates)

लखनऊचा जोरदार विजय

कोलकाता नाईट रायडर्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरनने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली.

तर क्विंटन डी कॉकने २८ धावांची खेळी केली. लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रिंकू सिंगने नाबाद ६७ धावांची केली. मात्र कोलकाताचा संघ विजयापासून १ धाव दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT