GAUTAM GAMBHIR twitter
Sports

Gautam Gambhir ने निवडली ग्रेट प्लेइंग 11! भारताचा एकही खेळाडू नाही, पण पाकिस्तानच्या तिघांची निवड

Gautam Gambhir All Time Playing XI: भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीरने आपली ऑल टाइम ग्रेट प्लेइंग ११ निवडली आहे. या प्लेइंग ११ मध्ये त्याने एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिलेलं नाही.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविड यांचा मु्ख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरचा मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे.

भारतीय संघाला २०११ वनडे वर्ल्डकप आणि २००७ टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात गौतम गंभीरने मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान गंभीरने आपल्या ऑल टाईम बेस्ट प्लेइंग ११ ची निवड केली आहे.

गौतम गंभीरने आपल्या ऑल टाइम प्लेइंग ११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंना स्थान दिलं आहे. ज्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या ३-३, दक्षिण आफ्रिकेच्या २,वेस्टइंडीज आणि इंग्लंडच्या १-१ खेळाडूंची निवड केली आहे.

स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत, गौतम गंभीरने आपल्या ऑल टाइम प्लेइंग ११ ची निवड केली आहे. यादरम्यान गंभीरने अशा ११ खेळाडूंची नावं सांगितली ज्यांच्याविरुद्ध त्याला खेळण्याची संधी मिळाली. या प्लेइंग ११ मध्ये त्याने एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिलेलं नाही.

गौतम गंभीरने आपल्या प्लेइंग ११ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघातील माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स, वेस्टइंडिजचे माजी फलंदाज ब्रायन लारा, अँड्रूयू सायमंड्स आणि इंजमाम उल हक यांची निवड केली.

यासह श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन , इंग्लडचा माजी गोलंदाज अँड्र्यू फ्लिंटॉफ, मॉर्ने मॉर्कल, अब्दुल रज्जाक आणि शोएब अख्तर यांचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

गौतम गंभीरने निवडलेली ऑल टाइम ग्रेट प्लेइंग ११: अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रीका), ब्रायन लारा (वेस्टइंडीज), अँड्रू सायमंड्स (ऑस्ट्रेलिया), इंजमाम-उल-हक (पाकिस्तान), अब्दुल रज्जाक (पाकिस्तान), मुथैय्या मुरलीधरन (श्रीलंका), शोएब अख्तर (पाकिस्तान), मॉर्ने मोर्कल (साउथ अफ्रीका), अँड्रू फ्लिंटॉफ (इंग्लंड)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

Palash Muchhal Net Worth : स्मृती मानधाना की पलाश मुच्छल कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?

SCROLL FOR NEXT