Gautam Gambhir News: विराट - रोहितचं भवितव्य ते 2027 WC प्लान! वाचा गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

Gautam Gambhir Press Confernece Highlights: गौतम गंभीर आणि अजित आगरकरांच्या पत्रकार परिषदेत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
Gautam Gambhir News: विराट - रोहितचं भवितव्य ते 2027 WC प्लान! वाचा गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
gautam gambhir twitter
Published On

भारतीय आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये येत्या २७ जुलैपासून टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघातील खेळाडू श्रीलंकेला रवाना होणार आहेत. दरम्यान या दौऱ्यावर जाण्यापूर्वी, नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. दरम्यान कोणते आहेत ते मुद्दे? जाणून घ्या.

विराट- रोहित वनडे वर्ल्डकप खेळणार?

विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हे दोघेही वनडे वर्ल्डकप २०२७ वर्ल्डकप खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान गंभीरने स्पष्ट केलंय की, जर हे दोघेही फिट असतील, तर दोघेही वनडे वर्ल्डकप खेळताना दिसून येतील.

सूर्यकुमार यादवबाबत मोठा निर्णय

सूर्यकुमार यादवकडे टी-२० संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र तो इतर फॉरमॅटमध्ये खेळताना दिसून येणार नाही. कारण वनडे संघात श्रेयस अय्यर आणि केएल राहुलसारखे फलंदाज जे मध्यक्रमात खेळताना दिसून येतील.

रविंद्र जडेजा वनडे खेळणार

टी-२० वर्ल्डकपनंतर जडेजानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध जाहीर करण्यात आलेल्या वनडे संघातही त्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे अशी चर्चा सुरु होती की, जडेजा केवळ कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येणार. मात्र आता स्पष्ट झालंय की, जडेजाची वनडेतून सुट्टी झालेली नाही.

Gautam Gambhir News: विराट - रोहितचं भवितव्य ते 2027 WC प्लान! वाचा गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून 117 खेळाडू उतरणार मैदानात! महाराष्ट्रातील किती खेळाडूंचा समावेश?

गिल तिन्ही फॉरमॅट खेळणार

शुभमन गिलला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० आणि वनडे मालिकेत उप कर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे.अजित आगरकरांनी स्पष्ट केलंय की, गिल तिन्ही फॉरमॅट खेळणार.

हार्दिकला कर्णधारपदावरुन का काढलं?

हार्दिक पंड्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा उप कर्णधार होता. मात्र श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून त्याचं उप कर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. दरम्यान फिटनेसच्या समस्येमुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

Gautam Gambhir News: विराट - रोहितचं भवितव्य ते 2027 WC प्लान! वाचा गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
Paris Olympics 2024 Schedule: पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू सज्ज! केव्हा, कुठे अन् किती वाजता रंगणार सामने?वाचा सविस्तर

शमी केव्हा परतणार?

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला. त्यानंतर तो कमबॅक करु शकलेला नाही. दरम्यान तो बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून कमबॅक करु शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com