Gautam Gambhir: गंभीर हेड कोच म्हणून फार काळ टिकणार नाही..दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Joginder Sharma On Gautam Gambhir: भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
Gautam Gambhir: गंभीर हेड कोच म्हणून फार काळ टिकणार नाही..दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा
gautam gambhirtwitter
Published On

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने बाजी मारली. या मालिकेनंतर आता वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत समाप्त झाला. या मालिकेतून गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक म्हणून पदार्पण केलं आहे.

Gautam Gambhir: गंभीर हेड कोच म्हणून फार काळ टिकणार नाही..दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा
IND vs SL: श्रीलंकेविरोधात पहिला वनडे टाय, रोहित शर्मा निराश, म्हणाला ती एक धाव...

टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. ही जबाबदारी आता भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने स्वीकारली आहे. दरम्यान भारतीय संघाला २००७ चा टी -२० वर्ल्डकप जिंकून देण्यात निर्णायक षटक टाकणाऱ्या जोगिंदर शर्माने गौतम गंभीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला जोगिंदर शर्मा?

जोगिंदर शर्माच्या मते गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून फार काळ टिकू शकणार नाही. तो म्हणाला की, ' गौतम गंभीर भारतीय संघाला सांभाळू शकतो. पण तो मुख्य प्रशिक्षक म्हणून फार काळ टिकू शकणार नाही.'

जोगिंदर शर्मा असं का म्हणाला?

गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या भवितव्याबाबत बोलताना जोगिंदर शर्मा म्हणाला की, ' गौतम गंभीरचे निर्णय हे जरा वेगळेच असतात. एखाद्या खेळाडूसोबत नक्कीच मतभेत होऊ शकतात. मी विराट कोहलीबद्दल बोलत नाहीये. गौतम गंभीरचे अनेक निर्णय असे असतात जे इतरांना पटत नाहीत.'

Gautam Gambhir: गंभीर हेड कोच म्हणून फार काळ टिकणार नाही..दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा
Paris Olympics 2024, Hockey: भारताची सेमिफायनलमध्ये थाटात एन्ट्री! ग्रेट ब्रिटेनला शूट- 'आऊट' करत रचला इतिहास

राहुल द्रविडनंतर यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर संपला होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपर्यंत थांबण्याची मागणी केली होती. या विनंतीला मान देत राहुल द्रविड या स्पर्धेपर्यंत थांबले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. दरम्यान राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com