gautam gambhir twitter
Sports

Gautam Gambhir Farewell: '..तेव्हा मलाही रडू येतं',KKR ला अलविदा करताना गौतम गंभीर भावुक; पाहा VIDEO

Gautam Gambhir KKR Farewell Video: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनतात गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाची साथ सोडली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. राहुल द्रविड यांचा मु्ख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. यापूर्वी गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाळी खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने वर्षांची प्रतीक्षा संपवत आयपीएलची ट्रॉफी उंचावली. दरम्यान आता गंभीरने इमोशनल व्हिडिओ शेअर करत फ्रेंचायजीला निरोप दिला आहे.

आगामी श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीरचा मुख्यप्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरु होणार आहे. ज्या व्यक्तीची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड होते. तो व्यक्ती इतर कुठल्याही संघाला प्रशिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा निरोप घेतला आहे. संघाचा निरोप घेत असताना गंभीरने भावुक करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओत काय म्हणाला गंभीर?

या व्हिडिओमध्ये गंभीर म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही हसता तेव्हा मी पण हसतो, जेव्हा तुम्ही रडता तेव्हा मलाही रडू येतं, जेव्हा मी जिंकतो तेव्हा तुम्हीही जिंकता, मी स्वप्न पाहतो जेव्हा तुम्ही स्वप्न पाहतो.' गंभीरने या भावुक करणाऱ्या व्हिडिओतून कोलकात्यातील क्रिकेट फॅन्सला भावनिक साद घातली आहे. यासह भावुक करणारा संदेश दिला आहे. या व्हिडिओवर नेटकरीही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

गौतम गंभीरने २०२२ आणि २०२३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत लखनऊ सुपर जांट्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना या संघाने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. दरम्यान २०२४ स्पर्धेसाठी गंभीरची कोलकाता नाईट रायडर्स संघात एन्ट्री झाली. यापूर्वी त्याने कर्णधार म्हणूनही कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. आता त्याने मार्गदर्शक म्हणून कोलकाताला आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT