Gautam Gambhir Yuvraj Singh Funny Moments Saam Tv
Sports

Gautam Gambhir : GG कभी हंस भी लिया करो...! गौतमची इन्स्टावर खास पोस्ट; फोटो पाहताच युवराजने घेतली 'गंभीर' फिरकी

Gautam Gambhir Insta Post : गौतम गंभीरने सोशल मीडियावर गुलाबजाम खातानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर युवराज सिंह, इरफान पठाण अशा अनेक खेळांडूंनी कमेंट केले आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Yash Shirke

Gautam Gambhir Photo : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी गंभीरकडे प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हेड कोच म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्याने भारतीय संघामध्ये अनेक बदल केले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गंभीरने जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला संधी दिली. यांसारख्या अनेक निर्णयांमुळे गंभीर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

पण सध्या गंभीर त्याच्या निर्णयांऐवजी एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. गंभीरने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्याने टीम इंडियाचे टी-शर्ट आणि हूड घातल्याचे पाहायला मिळते. त्याच्यासमोर एका वाटीमध्ये दोन गुलाबजाम दिसतात. गंभीर त्या गुलाबजामचा आस्वाद घेत असल्याचे फोटोमध्ये मिळते. या फोटोला गौतम गंभीरने 'आयुष्य छोटं आहे, त्याला गोड बनवा!' (Life is short, make it sweet!) असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोवर माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने कमेंट केली आहे. युवराजने 'जीजी जर आयुष्य छोटं असेल, तर तू थोडं हसू देखील शकतोस' (GG If life is short thane u can smile also) असे म्हटले आहे. युवराजच्या कमेंटला रिप्लाय करत गंभीरने 'अरे माझी पूर्वीची पोस्ट बघ जरा, तू जेव्हा माझ्या आसपास असतोस तेव्हा मी हसतो, स्माईल करतो!' (Arre see my previous post, Waise I always smile when u r around!) अशी कमेंट केली.

Gautam gambhir yuvraj singh comment

या फोटोवर इरफान पठाणने देखील कमेंट केली आहे. त्याने 'भाई हे दाल राईस खाल्यानंतरच आहे ना?' (Bhai ye daal rice ke baad hai?) असे म्हटले आहे. या कमेंटवर गंभीरने तु खरंच मला ओळखतोस भावा! (you know me so well brother!) अशी कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT