Gautam Gambhir x
Sports

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Gautam Gambhir News : भारत कसोटी क्रिकेटमध्ये मागे पडला आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडने भारताच्या कसोटी संघाला पछाडले आहे. या परिस्थितीवरुन प्रशिक्षक गौतम गंभीरच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Yash Shirke

  • कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा संघ मागील काही काळापासून मागे पडला आहे.

  • मागील दीड वर्षात भारताने ४ कसोटी सामने जिंकले आणि ८ सामने गमावले आहेत.

  • या खराब कामगिरीला गौतम गंभीर कारणीभूत असल्याचे अनेकजण म्हणत आहेत.

Ind vs Eng Test Series : इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये सध्या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील चौथी कसोटी खेळली जात आहे. या कसोटीमध्ये गोलंदाजी, फलंदाजीसह प्रत्येक पैलूमध्ये इंग्लंडने भारताला पाणी पाजले आहे. इंग्लंडने सामन्याच्या पहिल्या डावात तब्बल ६६९ धावा केल्या आहेत. हा सामना भारताच्या हातून निसटला आहे. मालिकेमध्येही इंग्लंडचा संघ भारतीय संघावर वरचढ ठरत आहे. या एकूण परिस्थितीवरुन भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर आणि त्याच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. जुलै २०२५ मध्ये गंभीरकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले. मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीरने त्याच्या सोयीनुसार संघाशी संबंधित निर्णय घेतली. कोचिंग स्टाफ निवडण्यापासून ते दौऱ्यावर कोण-कोण येणार इथपर्यंत गंभीरकडे प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. गंभीरच्या कार्यकाळात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारत मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे.

आकडेवारीनुसार, गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारताने १३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ८ सामने भारताने गमावले आहेत. ४ सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे, तर एक सामना ड्रॉ झाला आहे. गौतम गंभीरच्या कार्यकाळामध्ये भारताच्या कसोटी संघाची जिंकण्याची टक्केवारी फक्त ३०.७६ टक्के इतकी आहे.

जुलै २०२५ पासून भारताने बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि सध्या सुरु असलेली इंग्लंड विरुद्धची मालिका अशा चार कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यातील बांगलादेश कसोटी मालिका भारताने २-० च्या फरकाने जिंकत बांगलादेशचा धुव्वा उडवला. पण घरच्या मैदानात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. तब्बल २५ वर्षींनी भारत घरच्या मैदानावर खेळताना व्हाईटवॉश झाला. मालिकेतील एकही सामना भारताला जिंकता आला नाही.

न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश झाल्यानंतर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देखील गमावली. ऑस्ट्रेलियाने ३-१ ने भारतावर मात केली. मालिकेतील एक सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. जून २०२५ मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. अँडरसन-तेंडुलकर मालिकेमध्ये भारताने आतापर्यंत २ सामने गमावले आहेत. मँचेस्टर कसोटीमध्येही भारताचा पराभव होणार असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांचे संगमनेरात जल्लोष स्वागत...

Monday Horoscope : स्पर्धात्मक वातावरणात प्रगती होईल, ५ राशींना मिळेल यश; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Bigg Boss 19: आजपासून सुरू होणार 'बिग बॉस १९'; सलमान खानचा शो कुठे आणि किती वाजता पाहता येईल जाणून घ्या

Mumbai Building Fire: आकाशात धुरांचे लोट,आगीचं विक्राळ रुप, मालाडमधील उच्चभ्रु इमारतीच्या १२ व्या मजल्याला भीषण आग|VIDEO

ECCE Act: प्ले ग्रुप,नर्सरीवर सरकारची नजर; खाजगी पूर्व प्राथमिकच्या शुल्क अन् प्रवेश नियंत्रणासाठी येणार कायदा

SCROLL FOR NEXT