four teams which may qualify for ipl 2024 playoffs know the scenario amd2000 saam tv news
क्रीडा

IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

IPL 2024 Top 4 Teams Prediction: प्लेऑफमध्ये २ स्थानांसाठी ५ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून लखनऊ सुपरजायंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

प्लेऑफमध्ये २ स्थानांसाठी ५ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून लखनऊ सुपरजायंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्याचा निकाल राजस्थान रॉयल्ससाठी दिलासा देणारा ठरला आहे. कारण दिल्लीच्या विजयानंतर राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

प्लेऑफमध्ये जाणारे २ संघ ठरले आहेत. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दरम्यान कोणते २ संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतात? जाणून घ्या.

सनरायझर्स हैदराबादला टॉप ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कारण सनरायझर्स हैदराबादने १२ सामने खेळले आहेत. इथून पुढे या संघाला २ सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने जिंकून १८ गुणांसह हा संघ प्लेऑफमध्ये एन्ट्री करु शकतो. जर एक सामना गमावला, तरीदेखील हा संघ १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. जर या संघाने दोन्ही सामने गमावले तरीदेखील नेट रनरेटच्या बळावर हा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो.

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा सर्वात कमी चान्स लखनऊ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा आहे. कारण दिल्लीचे १४ सामने झाले आहेत. हा संघ १४ गुणांच्या पुढे जाऊ शकणार नाही. तर लखनऊने गेले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे शेवटच्या सामन्यात लखनऊला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. यासह प्रार्थना करावी लागेल की, सीएसके, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीचा मोठ्या फरकाने पराभव झाला पाहिजे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची समान संधी आहे. जर चेन्नईने आरसीबीला पराभूत केलं, तर चेन्नईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. मात्र आरसीबीने हा सामना जिंकला, तर नेट रनरेटच्या आधारे कुठला तरी एक संघ प्लेऑफमध्ये जाईल. आरसीबीला प्लेऑफमध्ये जायचं असेल, तर हा सामना १८ धावांनी किंवा १८ षटकात जिंकणं गरजेचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT