Bray Wyaat death news  saam tv
क्रीडा

Bray Wyatt Death: माजी WWE हेवीवेट चॅम्पियन ब्रे व्याटचे निधन! 36 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!

Bray Wyatt Death News In Marathi: प्रसिद्ध माजी WWE हेवी वेट चॅम्पियन ब्रे व्याटने जगाचा निरोप घेतला आहे

Ankush Dhavre

WWW Star Bray Wyatt Died At Age Of 36:

प्रसिद्ध माजी WWE हेवी वेट चॅम्पियन ब्रे व्याटने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाल्याने WWE फॅन्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे. ब्रे व्याटने आपल्या फायटींग स्किल्सने आणि लोकांना घाम फुटेल अशा एन्ट्रीने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

ब्रे व्याटच्या निधनाची बातमी ट्रिपल एचने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

ट्रिपल एचने ट्विट करत लिहिले की, ' नुकताच मला हॉल ऑफ फेमर माईक रोटूंडाचा कॉल आला होता. त्याने मला सांगितलं की, विंडम रोटूंडा ज्याला ब्रे व्याट या नावाने ओळखलं जातं, त्याचं निधन झालं आहे.

आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. मी विनंती करतो की, या कठीण काळात प्रत्येकाने त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा.' (Latest sports updates)

माध्यमातील वृत्तानुसार त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. तर वर्षाच्या सुरुवातीला त्याला कोविडची लागण देखील झाली होती. त्यामुळे त्याची प्रकृती आणखी खालावली होती.

याच कारणामुळे त्याला हृदविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. २००९ मध्ये तो पहील्यांदा रेसलिंग करण्यासाठी रिंगमध्ये उतरला होता. तर एप्रिल २००९ मध्ये तो पहिल्यांदा टीव्हीवर झळकला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT