rahul dravid twitter
क्रीडा

Rahul Dravid, Head Coach: राहुल द्रविड हेड कोच म्हणून परतणार! समोर आली मोठी अपडेट

Rajasthan Royals, Rahul Dravid: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतात.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि दुसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. ही स्पर्धा अतिशय महत्वाची होती. कारण ही मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची शेवटची स्पर्धा होती. भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली आणि राहुल द्रविड यांना विजयाने निरोप दिला. दरम्यान आता राहुल द्रविड यांना मोठी ऑफर मिळू शकते,असं म्हटलं जात आहे.

राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर समाप्त झाला होता. मात्र रोहित शर्मा आणि जय शहा यांनी त्यांना टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत थांबण्याची विनंती केली. राहुल द्रविड यांनी या विनंतीली मान दिला आणि भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून दिला. त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षक बनण्याची ऑफर दिली गेली होती. मात्र त्यांनी नकार दिला होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून कमबॅक करु शकतात. आयपीएल २०२५ स्पर्धेत ते राजस्थान रॉयल्स संघाला प्रशिक्षण देताना दिसून येऊ शकतात. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली होती. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा या संघासाठी डायरेक्टर ऑफ क्रिकेटची भूमिका पार पाडतोय. जर राहुल द्रविड यांनी ही जबाबदारी स्वीकारली, तर या संघाची ताकद आणखी वाढेल. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ राहुल द्रविड यांना आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावू शकतो.

राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम केलं आहे. यासह त्यांनी भारताच्या अंडर १९ संघाला देखील प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अंडर १९ वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. यामध्ये आता टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीचीही भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Irregular Periods: गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास पिरीयड्सची समस्या होईल दूर; अनिरुद्धचार्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT