team india yandex
Sports

Team India Bowling Coach: ठरलं! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू बनला टीम इंडियाचा बॉलिंग कोच

Morne Morkel: दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्ने मॉर्कलची भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आली आहे. मॉर्ने मॉर्कल हा दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी त्याचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. आता तो भारतीय गोलंदाजांना गोलंदाजीचे धडे देताना दिसून येणार आहे.

भारतीय गोलंदाजांना देणार गोलंदाजीचे धडे

काही दिवसांपूर्वी भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. ज्यावेळी गौतम गंभीरच्या नावाची चर्चा होत होती. त्यावेळी गौतम गंभीरने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्कलच्या नावाची चर्चा सुरू होती.

गौतम गंभीरची नियुक्ती झाल्यानंतर, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायरची नेमणूक करण्यात आली होती. आता गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्कलच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, मॉर्ने मॉर्कल भारतीय संघाला गोलंदाजीचे धडे देणार आहे. मॉर्ने मॉर्कल १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतून भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कारभार सांभाळणार आहे. तो श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासोबत जाणार होता. मात्र टी -२० मालिकेत व्यस्त असल्यामुळे त्याला प्रशिक्षकपदाचा कारभार स्वीकारता आला नव्हता. त्यामुळे बीसीसीआयने साईराज बहुतुले यांना स्थायी प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT