cricket saam tv news
Sports

Former Rajasthan Cricketer Dies : राजस्थानचा माजी रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन; क्रीडा विश्वावर शोककळा

Former Rajasthan Cricketer dies : राजस्थानचा माजी रणजी क्रिकेटपटू रोहित शर्मा याचं ४० व्या वर्षी निधन झालं आहे. रोहित आक्रमक आणि लेग स्पिनर गोलंदाज होता.

Vishal Gangurde

Former Rajasthan Cricketer Rohit Sharma Dies :

राजस्थानचा माजी रणजी क्रिकेटपटू रोहित शर्मा याचं ४० व्या वर्षी निधन झालं आहे. रोहित आक्रमक आणि लेग स्पिनर गोलंदाज होता. रोहित शर्माची अचानक तब्येत बिघडल्यानंतर त्याला जयपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान रोहित शर्माचं निधन झालं. रोहित शर्मा हा लिव्हरशी निगडीत आजाराने त्रस्त होता. (latest Marathi News)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राजस्थानमधील आक्रमक फलंदाजांमध्ये रोहित शर्माचं नाव होतं. रोहित शर्माने राजस्थानसाठी ७ रणजी सामने खेळले आहेत. तसेच त्याने २८ रणजी वनडे आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. रोहित शर्माची जयपूरमध्ये आरएस अॅकेडमी नावाची क्रिकेट अॅकेडमी आहे.

रोहित शर्माला आक्रमक फलंदाज म्हणून नावाजलं जायचं. राजस्थानचा माजी रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. रोहितच्या निधनाने क्रिकेट जगतात शोक व्यक्त करण्यात येत आहे. रोहित शर्माने अनेक रणजी क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.

राजस्थानचा माजी रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये ११४७ धावा कुटल्या आहेत. तर ७ गडी बाद केले आहेत. २००४ मध्ये रेल्वेच्या विरोधात रणजी ट्रॉफी सामन्यात राजस्थान संघात पदार्पण केलं. तर २०१४ मध्ये त्याने शेवटची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळली . तर काही वर्षांपासून रोहित शर्मा हा त्याच्या आरएस क्रिकेट अॅकेडमीमध्ये युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत होता.

रोहित शर्माच्या मित्रांनी त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. त्याच्या मित्रांनी म्हटलं की, रोहित शर्माच्या मृत्यूमुळे क्रीडा विश्वाला धक्का बसलाय. देव रोहितच्या आत्म्याला शांती देवो. आम्ही या दु:खद काळात रोहितच्या कुटुंबासोबत आहोत. दरम्यान, रोहितच्या निधनानंतर जिल्हा क्रिकेट संघ सदस्य, माजी आणि आजी खेळाडूंनी निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT