Wazir Mohammad Death x
Sports

Cricketer Death : प्रसिद्ध कसोटीपटूचा मृत्यू, इंग्लंडमध्ये घेतला शेवटचा श्वास; क्रिकेट विश्वात शोककळा

Wazir Mohammad : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वझीर मोहम्मद यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. निवृत्तीनंतर ते लंडनला स्थायिक झाले होते. बर्मिंगहॅममध्ये त्यांचे निधन झाले.

Yash Shirke

  • वझीर मोहम्मद यांचे निधन

  • वयाच्या ९५ व्या वर्षी निधन

  • क्रिकेटजगतात हळहळ

Wazir Mohammad Death : क्रिकेट विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू वझीर मोहम्मद यांचे बर्मिंगहॅम येथे निधन झाले आहे. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते पाकिस्तानी क्रिकेटपटू हनीफ, मुश्ताक आणि सादिक मोहम्मद यांचे थोरले बंधू होते. १९५२ मध्ये पहिली कसोटी मालिका खेळणाऱ्या पाकिस्तानी संघातील वझीर सर्वात वयस्कर सदस्य होते.

वझीर मोहम्मद यांनी १९५१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारताविरुद्ध त्यांनी पहिला कसोटी सामना खेळला. १९५२ ते १९५९ दरम्यान त्यांनी पाकिस्तानकडून २० कसोटी सामने खेळले. १९५९ मध्ये ढाका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यांनी फक्त सात वर्षे पाकिस्तानचे प्रतिनिधित्त्व केले.

वझीर मोहम्मद यांनी २० कसोटी सामन्यांमध्ये ७.६२ च्या सरासरीने ८०१ धावा केल्या. यामध्ये त्यांनी दोनदा शतकीय कामगिरी केली. तसेच तीन अर्धशतकेही ठोकली. १०५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी ४०.४० च्या सरासरीने ४,९३० धावा केल्या. यात ११ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. ते अनेक वर्ष काउंटी क्रिकेटमध्येही सक्रीय होते.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वझीर मोहम्मद यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीचे सल्लागार म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते ब्रिटनला गेले. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी वझीर मोहम्मद यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांना श्रद्धांजली वाहताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवेदन देखील जारी केले. या घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devmanus: 'मी संपणाऱ्यातील नाहीये…'; माधुरीला कोणी मारलं? 'देवमाणूस'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Crime News: बंद घरात सापडला MBA विद्यार्थिनीचा कुजलेला मृतदेह; परिसरात खळबळ

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

SCROLL FOR NEXT