Firing : शहरातील प्रसिद्ध बारमध्ये बेछूट गोळीबार; ४ जण जागीच ठार, २० जण जखमी

USA South Carolina Firing : अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनातील एका लोकप्रिय बारमध्ये गोळीबाराची घटना घडली. गोळीबारामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर जवळपास २० जण जखमी झाले.
Firing
Firing x
Published On
Summary
  • दक्षिण कॅरोलिनातील बारमध्ये गोळीबार.

  • चौघांचा मृत्यू, तर २० जण जखमी.

  • २० पैकी ४ जणांची प्रकृती गंभीर.

Shooting : एका बारमध्ये अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये चौघांचा मृत्यू झाला. तर २० नागरिक जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक आणि जखमींच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही घटना अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामधील एका बारमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कॅरोलिनाच्या सेंट हेलेना बेटावरील विलीज बार अँड ग्रिल येथे गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराच्या वेळी बारमध्ये मोठी गर्दी जमली होती. गोळीबारामध्ये चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तसेच किमान २० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना रविवारी (१२ ऑक्टोबर) पहाटे घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Firing
Afghanistan Attack : वाद पेटला! अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, २०० तालिबानी तरुणांचा मृत्यू

स्थानिक पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. ब्यूफोर्ट काउंटी शेरीफ कार्यालयाने यासंंबंधित एक्स पोस्ट शेअर केली आहे. पोलिसांनी मृतक आणि जखमींची माहिती दिली. 'गोळीबार होत असताना स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेकजण पळाले, ज्यांना लपायची जागा मिळाल, ते लपून बसले. ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. आमचा तपास सुरु आहे. यादरम्यान नागरिकांनी संयम बाळगावा अशी विनंती', असे एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

Firing
Accident : बसचालकाला हृदयविकाराचा झटका, चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् मोठा अनर्थ घडला; Video

चौघांचा जागीच मृत्यू झाला. किमान २० जण जखमी आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींवर जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्याप मृतक आणि जखमींची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Firing
Student Death : 10 हजारांची मागणी, पैसे न दिल्यानं बेदम मारलं; पोलीस कॉन्स्टेबलच्या मारहाणीत BTech विद्यार्थ्याचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com