Shoaib Akhtar On Pakistan Team:  Saam tv news
Sports

PAK vs SL, Asia Cup 2023: पाकिस्तानचा संघ बाहेर पडताच शोएब अख्तर कडाडला! IND-PAK अंतिम सामन्याबाबत केलं मोठं वक्तव्य

Shoaib Akhtar On Pakistan Team: या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Shoaib Akhtar Statement On Pakistan Team:

गतविजेत्या श्रीलंकेने गुरूवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत आशिया चषकाची अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ भारतीय संघाविरूद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे.

तर ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाला परभवाची चव चाखावी लागली आहे. यावेळी क्रिकेट फॅन्सचं, आशिया चषकात भारत- पाकिस्तान सामना पाहण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरला देखील असं वाटलं होतं की, पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. मात्र श्रीलंकेने दमदार खेळ करत पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

याबाबत बोलताना शोएब अख्तर म्हणाला की,'पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत जाण्यासाठी प्रबळ दावेदार होता. मात्र ते आता या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यांच्यावर टीका केली जाऊ शकते. कारण ते जेतेपदासाठी प्रबळ दावेदार होते.'

तसेच भारत- पाकिस्तान अंतिम सामन्याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'दुर्दैवाने,भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पाहायला मिळणार नाही. या स्पर्धेत आतापर्यंत असं कधीच झालं नाही. यावेळी पाकिस्तानकडे संधी होती. मात्र श्रीलंकेने दमदार खेळ केला. श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला.' (Latest sports updates)

भारत-श्रीलंकेत रंगणार अंतिम सामना..

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेचा संघ आठव्यांदा अंतिम फेरीत आमने सामने येणार आहेत. हा सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे.

गेल्या ७ सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर भारतीय संघाने ४ वेळा बाजी मारली आहे तर श्रीलंकेला ३ वेळा विजय मिळवण्यात यश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT