babar azam
babar azam saam tv

Pak vs Sl,Asia Cup 2023: पाकिस्तानच्या पराभवाची नेमकी कारणं काय? स्वत: कर्णधार बाबरने केला खुलासा

Reasons Behind Pakistan Defeat: पाकिस्तानच्या पराभवाची नेमकी कारणं काय?

Babar Azam Statement:

आशिया चषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. अंतिम फेरीत जाण्यासाठी श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला.

या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत श्रीलंकेने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे.तर स्पर्धेतून बाहेर पडलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम नाराज असल्याचं दिसून आलं आहे.सामन्यानंतर त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

babar azam
IND vs BAN, Playing XI : टीम इंडियात होणार मोठे बदल! बांगलादेशला आव्हान देण्यासाठी या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

हा सामना झाल्यानंतर बाबर आझमने पराभवाचं नेमकं कारण काय? याबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, आम्ही शेवटी असं ठरवलं की, शेवटी संघातील सर्वोत्तम गोलंदाजाला गोलंदाजी देऊ. त्यामुळे मी शाहीनला दुसरे आणि शेवटचे षटक दिले . त्यानंतर मी जमान खानवर विश्वास दाखवला. श्रीलंकेच्या खेळाडूंनी खूप चांगला खेळ केला,त्यामुळे आम्ही पराभूत झालो.

गोलंदाजीत केलेली सुमार कामगिरी देखील पराभवाचं कारण असल्याचं बाबर आझमने सांगितलं. त्याने याबाबत बोलताना तो म्हणाला की,'मधल्या षटकात आम्ही हवी तशी कामगिरी करू शकलो नाही.

मेंडीस आणि समरविक्रमाने केलेली भागीदारी आम्हाला महागात पडली. आम्ही सुरूवात चांगली करतोय शेवटही चांगला करतोय मात्र मधल्या षटकांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही.' (Latest sports updates)

श्रीलंकेचा जोरदार विजय..

या सामन्यात देखील पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे हा सामना ४२-४२ षटकांचा खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाने ४२ षटकअखेर ७ गडी बाद २५२ धावा केल्या होत्या.

babar azam
IND vs BAN, Asia Cup 2023: भारत -बांगलादेश सामना रद्द होणार? समोर आलं मोठं कारण

पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने ८६ धावांची खेळी केली. या धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने २ गडी राखून हे आव्हान पूर्ण केले. श्रीलंकेकडून कुसल मेंडीसने ९१ धावांची खेळी केली. तर चरीथ असलंकाने नाबाद ४९ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com