rani rampal twitter
क्रीडा

Rani Rampal: १६ वर्षे भारतीय संघाचं प्रतिनिधित्व; माजी कर्णधाराची अचानक निवृत्ती

Rani Rampal Retirement: भारताची महिला हॉकीस संघाची माजी कर्णधार राणी रामपालने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

हॉकी विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपालने निवृत्तीची घोषणा केली आहे. गेली १६ वर्षे तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान तिने अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये गोल केले.

तिच्या नावे भारतासाठी खेळताना २५४ सामन्यांमध्ये १२० गोल करण्याची नोंद आहे. २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धत ती भारतीय संघाची कर्णधार होती. या स्पर्धेत भारतीय संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती.

निवृत्तीनंतर काय म्हणाली राणी रामपाल?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राणी रामपाल म्हणाली की, ' हा प्रवास खूप चांगला होता. मी कधीच विचार केला नव्हता की, मला भारतासाठी इतके वर्ष खेळण्याची संधी मिळेल. गरिबी मी खूप जवळून पाहिली आहे. त्यामुळे मला काहीतरी मोठं करायचं होतं. देशाचं प्रतिनिधित्व करणं हे माझं स्वप्नं होतं.

राणी रामपाल ही केवळ २९ वर्षांची आहे. तिला वयाच्या १४ व्या वर्षी भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. हरियाणाच्या छोट्याश्या गावातून येणाऱ्या राणीची परिस्थिती खूप हालाखीची होती. तिचे वडील गाडी ओढण्याचं काम करायचे.

मात्र तिने स्वप्नं पाहिलं आणि ते पूर्णही केलं. २०२३ मध्ये ती भारतीय संघासाठी आपला शेवटचा सामना खेळताना दिसून आली. संघातील कोचने तिला अचानक संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. तिला संघाबाहेर करण्याचं कारणही सांगण्यात आलं नव्हतं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

SCROLL FOR NEXT